computer

कोब्रा सूप बनवताना शेफचा मृत्यू कसा झाला? काय घडलंय या घटनेत?

माणसाच्या आयुष्यात मृत्यू कधी आणि कसा येईल, सांगता येत नाही. अपघाताने येणारे मृत्यू जास्त भयावह असतात. विषारी सर्पदंशामुळे  अनेक जण जीव गमावतात. जगात दरवर्षी 1 लाखांहून अधिक लोक साप चावल्यामुळे मरण पावतात.  पण ते जिवंत सापाच्या चाव्यामुळे घडतात. पण अलीकडेच चीनमध्ये अशी विचित्र घटना घडली आहे की ती वाचून तुम्हाला धक्का बसेल. 

चीनच्या ग्वांगडोंग प्रांताच्या फोशान शहरात राहणाऱ्या शेफ पेंग फॅन  यांच्याबाबतीत ही दु्दैवी घटना घडली आहे. हा शेफ नेहमीप्रमाणे कोब्रा सूप बनवत होता. सूपसाठी इंडोचायनिज स्पिटिंग कोब्रा सापाचे मांस वापरले जाते. त्या दिवशी पेंगने साप कापून त्याच्या स्वयंपाकघरात ठेवला होता. पेंगने कोब्राची मान वेगळी केली आणि त्याचे शरीर लहान तुकडे केले. साप कापल्यानंतर त्याने किचन साफ ​​करायला सुरुवात केली. तेव्हाच, ज्या ताटात त्याने सापाची मान ठेवली होती ते डोके डस्टबिनमध्ये फेकण्यासाठी उचलताच, सापाने त्याला दंश केला. विशेष म्हणजे सापाला मरून 20 मिनिटे होऊन गेली होती. तरीही सापाचे डोके जिवंत होते. डॉक्टर येण्याआधीच पेंग त्याच्या विषामुळे मरण पावला.

चीनमध्ये असे अनेक प्राणी खाल्ले जातात, ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. दक्षिण चीनमध्ये, कोब्रा सापाच्या कातडीपासून बनवलेले सूप मोठ्या उत्साहाने प्यायले जाते. या धोकादायक सापाची कातडी काढल्यानंतर त्याचे मांस शिजवले जाते आणि त्यातून सूप बनवले जाते. तिथे कोब्रा सूप खूप प्रसिद्ध आहे.काही देशांमध्ये असं मानलं जातं की सापाचं मांस खाल्ल्याने अनेक फायदे होतात. चीनमध्ये म्हणूनच इंडोचायनिज स्पिटिंग कोब्राची मोठ्या प्रमाणात शिकार होते. त्यामुळे  असेही म्हणतात तिथे सापांच्या काही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. 

 कोब्राचे विष खूप धोकादायक असते. त्याचा एक थेंब सुद्धा जीव घेतो. कोब्राच्या विषात न्यूरोटॉक्सिन असते, ज्याचा एक थेंब सुद्धा 30 मिनिटांत एखाद्याचा जीव घेऊ शकतो. कोब्रा चावल्यानंतर, लोकांना अर्धांगवायू होतो, ज्यानंतर त्यांचा गुदमरून मृत्यू होतो. या विषावर प्रभावी असे अँटी व्हेनम डोस बाजारात उपलब्ध आहेत पण ते ताबडतोब घ्यावे लागतात.  त्यादिवशी पेंगला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. डॉक्टर आले तेव्हा वेळ निघून गेली होती.

या विचित्र घटनेबद्दल बरीच चर्चा झाली. पूर्वीही अश्या घटना घडल्या आहेत असे तज्ञ म्हणतात.  सापाला मारले तरी सापाचे विष त्याच्या शरीरात सक्रिय राहते.  अशा परिस्थितीत जेव्हा पेंगने शिरच्छेद केलेल्या सापाला हात लावला तेव्हा त्याचा हात त्याच्या तोंडात किंवा आत गेला असावा.  

कोब्रा आणि रॅटलस्नेक सारख्या विषारी सापांसाठी चावणे ही प्रक्रिया खूप जलद घडते. त्यांच्या मेंदूत हे reflex असतात. 
इतर मांसाहारी प्राण्यांपेक्षा विषारी सापांमध्ये दंश करण्याचे reflex  अधिक प्रभावी असतात. त्यामुळे साप मेल्यानंतरही त्याच्या मेंदूमध्ये  सक्रिय राहतात.

त्यामुळे अश्या सापांपासून दूर राहणेच बरे अगदी मेल्यावरही! काय म्हणता?

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required