computer

आता खुशाल पादा - फ्रान्सच्या आजोबांनी शोधली आहे पादाला सुगंधात बदलणारी गोळी !!

मंडळी, जसं स्विमिंगपूल मध्ये कोणी गुपचूप लघवी केली हे कधीच समजत नाही तसंच गर्दीत कोण पादलं हे कोणीच सांगू शकत नाही. मग तुम्ही मोसाद, सीआयए किंवा आपल्या रॉ ची मदत घेतली तरी ते समजणार नाही. लहानपणी ग्रुप मधला पादरा शोधण्यासाठी आपण ‘आदा पादा कोन पादा’ करायचो. ती म्हण पण प्रसिद्ध होती “नाक धरी तो पाद करी”...
 

राव, खास करून गर्दीत प्रवास करणाऱ्यांना इतरांच्या पादण्यामुळे खूप त्रास होतो. तसं बघायला गेलं तर पादणाऱ्या व्यक्तीच्याही ते हातात नसतं. हा अपानवायू कुठेही, कधीही बाहेर पडू  शकतो. हा अनुभव तुम्हालाही आला असेलच. पण गुपचूप करायच्या या कामावर आज आम्ही एवढा आवाज का काढतोय असा प्रश्न पडला ना ? त्याचं कारण आहे एका आजोबांनी शोधून काढलेली गोळी. हे औषध घेतल्यावर तुमच्या पादण्याचं रुपांतर चक्क सुगंधात होतं राव.!!

मस्करी नाय राव, खरोखर. चला तर पूर्ण माहिती घेऊया. 

या आजोबांचं नाव आहे ख्रिश्चन पोइंचेव्हेल. ते फ्रान्सचे संशोधक आहेत. २००७ पासून ते पादण्यावर औषध शोधत होते. त्यांचं म्हणणं होतं की “पादल्यावर कोणालाही त्रास होता कामा नये”. याच तत्वावर ते अडून राहिले..... आणि कमाल बघा, त्यांनी तो ऐतिहासिक शोध लावलेला आहे. त्यांनी फक्त पादाला सुगंधात रुपांतरीत करायचं तंत्र शोधलेलं नाही, तर लोकांना ५ वेगवेगळ्या सुगंधाचे पर्यायही देऊ केले आहेत. म्हणजेच आता लोकांना चॉकलेट, गुलाब, लिली, व्हायलेट, अद्रक अशा ५ वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये पादता येईल.

मुंबईच्या लोकल मध्ये प्रवास करणारे लोक नक्कीच आजोबांसाठी दीर्घायुष्याची प्रार्थना करतील.

(ख्रिश्चन आजोबा)

राव, तसं पाहायला गेलं तर हे औषध नाही. हे एक प्रकारचं पूरक अन्न (Dietary Supplement) आहे. पूरक अन्न अनेक पोषक घटकांनी तयार केलेलं असतं. हे पूरक अन्न आपल्या शरीरातील पोषणद्रव्ये वाढवण्याचं काम करतं. ख्रिश्चन आजोबांची गोळी आपल्या पोटात गेल्यावर नेमकं हेच काम करते. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने सुद्धा या गोळीला औषध न म्हणता पूरक आहार म्हटलं आहे.

मंडळी, एवढं सगळं सांगितलं आता हेही ऐका की हे मिळेल कुठे.

तर, ही गोळी फ्रान्सची "Lutin Malin" कंपनी ऑनलाईन विकत आहे. या 'लिंक' वरून तुम्ही ती खरेदी करू शकता. गोळ्या ह्या फ्रान्सची राजधानी पॅरीस येथून पाठवल्या जातात. त्या भारतातही मागवल्या जाऊ शकतात. या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक जेवणानंतर तुम्हाला ४ ते ५ गोळ्या घेणं आवश्यक आहे.

तर मंडळी, कोण कोण आपल्या पादऱ्या मित्रांना हे बड्डे गिफ्ट देणार ??  सांगा सांगा !!

 

आणखी वाचा :

आता पादा बिन्धास्त; वाचा पादण्याचे सात फायदे....

सहकाऱ्याच्या पादण्याच्या सवयीमुळे त्याने घेतली कोर्टात धाव....मागितली तब्बल एवढी मोठी भरपाई !!

सबस्क्राईब करा

* indicates required