रोजच्या व्यस्त जीवनात मेंदू फ्रेश ठेवण्यासाठी करा ही सोप्पी ट्रिक !!

रोजच्या कामातून फक्त रात्रीच निवांत वेळ मिळतो ? ऑफिस मधल्या कामासाठी कॉम्पुटर वापरणे आणि वेळ मिळाला की मोबाईल एवढंच तुमचं आयुष्य उरलंय का ? मग तुम्हाला गरज आहे एका लहानशा ब्रेकची. घाबरू नका आम्ही तुम्हाला फिरायला जाण्याचे किंवा योग, ध्यानधारणा करण्याचा सल्ला देणार नाही. किंवा अमुक खा तमुक खा हे सुद्धा सांगणार नाही. आई सांगते तसं ‘जाळ तुझा मोबाईल’ हे तर कधीच सांगणार नाही.

आमचा उपाय सोप्पा आहे. तुम्ही जेजे म्हणून तंत्रज्ञान वापरता त्यापासून थोड्यावेळासाठी स्वतःची सुटका करून घ्या.

याचा अर्थ असा नाही की मोबाईल बंद, कॉम्पुटर बंद, घरातली वीज बंद आणि शांतपणे भिंतीकडे पाहत राहायचं. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की दिवसभरात कधीही मोबाईल फोन आणि यासारख्या डिव्हाईसेस पासून थोड्यावेळासाठी ब्रेक घ्या. या ब्रेक मध्ये तुम्ही पुस्तक वाचू शकता, वर्तमानपत्र चाळू शकता, मित्रांशी गप्पा मारू शकता, किंवा निव्वळ शांतही बसू शकता.

मोबाईल फोन किंवा कॉम्पुटर वर सतत काम केल्याने जो शीण येतो तो घालवण्यासाठी हा एक सोप्पा उपाय आहे. विशेषतः सोशल मिडियापासून लांब राहिल्याने त्यामुळे येणारा एकटेपणा, मत्सर, स्वतःची दुसऱ्यांसोबत तुलना करण्याची सवय यापासून लांब राहता येतं. संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की ५ दिवस फेसबुक पासून लांब राहिल्याने तुमच्या मेंदू तणाव मुक्त होण्यास मदत होते. झोपताना मोबाईल वापरायचा आणि उठल्यावर आधी मोबाईल मधले नोटिफिकेशन बघायचे यामुळे बऱ्याचजणांना निद्रानाशाचा त्रास होतो.

महत्वाचं म्हणजे मोबाईल, कॉम्पुटर मध्ये डोकं खुपसल्यानंतर आपण आजूबाजूला पाहत सुद्धा नाही. या डिव्हाईसेस पासून ब्रेक घेतल्याने आपण नव्याने आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला बघू लागतो. तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि मानसिक आरोग्य टवटवीत ठेवण्यासाठी हा छोटा ब्रेक टाईम उपयोगी पडतो. 

राव, आजच्या युगात प्रत्येकालाच काही मोबाईल आठवड्याभरासाठी बाजूला ठेवता येणार नाही पण त्यापासून थोड्यावेळासाठी का होईना नक्कीच लांब राहता येईल. आहे ना सोप्पी आयडिया ? मग आज पासूनच स्वतःसाठी थोडा वेळ काढा.

सबस्क्राईब करा

* indicates required