computer

हुर्रे...मराठी भाषा बोलणाऱ्यांचा टक्का वाढला हो. जाणून घ्या देशात कितव्या क्रमांकावर आहे आपली मातृभाषा!

भारतातील सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांबद्दल महत्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदी पहिल्या क्रमांकावर आहे यात वादच नाही. पण त्यानंतरचा नंबर कोणाचा लागतो हे महत्वाचं आहे. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आपली मराठी भाषा कितव्या स्थानावर आहे ?

चला तर पाहूयात हा अहवाल काय सांगतो ते... 

हिंदी ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे हे तर आपल्याला माहित आहेच. त्यानंतरचा नंबर लागतो बंगाली भाषेचा. सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये बंगाली दुसऱ्या क्रमांकावर (८.०३%) येते. आणि त्यानंतरचा तिसरा क्रमांक आपल्या मराठीचा आहे राव.

मराठी भाषेसाठी हा अहवाल अत्यंत महत्वाचा आहे. कारण २००१ च्या अहवालानुसार मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या १००% पैकी ६.९९% एवढी होती. आता ती वाढून ७.०९% झाली आहे. मराठीने तेलगु भाषेला मागे पाडत तिसरा क्रमांक पटकावला आहे.

मंडळी, या अहवालातील एका माहितीनुसार तब्बल २,६०,००० लोकांनी आपली प्राथमिक बोलीभाषा म्हणून इंग्रजीची निवड केली आहे. यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील तब्बल १,०६,६५६ लोकांनी इंग्रजीची निवड केली आहे. 

चला तर मंडळी पाहूयात भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या १० भाषा आहेत तरी कोणत्या !!

 

१. हिंदी

४३.६३%

२. बंगाली

८.०३%

३. मराठी

७.०९%

४. तेलगु

६.७०%

५. तमिळ

५.७०%

६. गुजराती

४.५८ %

७. उर्दू

४.१९%

८. कन्नड

३.६१%

९. ओडिया

३.१०%

सबस्क्राईब करा

* indicates required