computer

या एका फोटोमध्ये आहेत ४५ जाहिराती...तुम्हाला किती ओळखता येतायत पाहा !!

लहानपणच्या काही आठवणी  मनाच्या कप्प्यात कायम ताज्या असतात. काही आठवणी चित्रांच्या, प्रतिमांच्या रुपात असतात. काही स्मृती आवाजाच्या, गाण्याच्या रुपात जमा झालेल्या असतात. १९९० नंतर जन्माला आलेल्या मुलांचं नशिब तर  या बाबतीत फारच जोरावर आहे. १९९० नंतर घराघरात टिव्ही आला आणि त्यामुळे या पिढीच्या आवडत्या आठवणींच्या कोषात काही जिंगल्स आजन्म साठवलेल्या आहेत. आमचे बोभाटाचे बरेचसे वाचक या नव्वदीच्या दशकातले आहेत.

खास या 'मिलिनीयल' पिढीसाठी आम्ही आज एक पेंटिंग  घेउन आलो आहोत. या पेंटिंगमध्ये  तुमचे आवडते ४५ ब्रँड लपलेले आहेत. वरवर बघता हे एका गावाचे, गावाच्या बाजाराचे चित्र दिसते. पण त्यात दडलेले आहेत तुमच्या बालपणीचे काही खास अनुभव!! सध्या या पेंटिंगला ब्रँड बाजार, अ‍ॅड व्हिलेज, हिडन पर्सुएडर अशी वेगवेगळी नावं मिळाली आहेत.

जाहिरात क्षेत्रातल्या अनंत रंगास्वामी आणि जोसी पॉल या दोन मित्रांच्या गप्पांमध्ये हा विषय अचानक चर्चेला आला आणि या  कल्पनेचा जन्म झाला. BBDO  या आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणार्‍या संदीप सावंत, हितेश शहा, अरुण उदमाळे, सुबोध आणि पवन या चित्रकारांनी रोजचे ऑफीसचे काम संपल्यावर हे पेंटिंग बनवायला घेतले. २'×३' आकाराचे हे चित्र बनवायला एक महिना लागला. 

आता आमच्यातर्फे एक खास चॅलेंज बोभाटाच्या वाचकांसाठी!! या चित्रातल्या किती जाहीराती तुम्हांला ओळखता येतात ते बघू या!!

(फोटो झूम करून पाहा)

कमेंट बॉक्समध्ये तुमची उत्तरं नक्की लिहा.

या चॅलेंजची सुरुवात आम्ही आमच्यापासूनच केली आणि आम्हाला दिसली पिचवर धावत येणारी ती 'कॅडबरी वाली' मुलगी!! 

आठवते का ही जाहिरात? 

कुछ खास है जिंदगीमे. 
कुछ बात है जिंदगीमे..
खास है, कुछ स्वाद है,
क्या स्वाद है जिंदगीमे...... 

तर मंडळी, लागा कामाला कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे! पटापट लिहा तुम्ही ओळखलेल्या जाहिराती !! 

या प्रत्येक जाहिरातीमागे 'एक लंबी कहानी' आहे ती या आठवड्यात तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. पण तो पर्यंत कमेंटबॉक्स खुला आहेच!!