पुरुष मंडळींनो, हँडसम दिसण्यासाठी हे ५ सोप्पे उपाय करून पाहा !!

मंडळी, स्त्रिया जेवढ्या आपल्या लुक्सवर लक्ष देतात तेवढे पुरुष देत नाहीत असं म्हणतात. पण अंदरकी बात अशी आहे की आता पुरुषसुद्धा स्त्रियांएवढेच आपल्या लुक्सकडे लक्ष देतात. आता चांगले दिसणे काय वाईट गोष्ट आहे का राव?? म्हणून चांगले दिसण्यासाठी प्रयत्न करायलाच पाहीजेत. चांगले दिसायचे तर आहे पण त्यासाठी महाग सलून परवडत नाही असे म्हणणारे तरुण पण खूप आहेत. लेकीन फिकीर नॉट मंडळी. आम्ही आहोत ना राव!! आम्ही तुम्हाला काही सिम्पल फंडे सांगणार आहोत. तेवढे जरी व्यवस्थित केले तरी तुमचे काम होईल राव!!
आपला लुक आकर्षक असावा असे प्रत्येकाला वाटते. चेहरा चमकायला हवा असेल तर त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. चेहऱ्यावरील बारीक सारीक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. काहींचा असा गैरसमज असतो कि महाग स्किन केयर प्रॉडक्ट्स वापरले म्हणजे आपण हँडसम दिसायला लागू. पण तसे असते तर सगळेच हँडसम झाले असते राव!! तुम्ही कितीही महाग प्रॉडक्ट वापरा, जोवर तुम्ही तुमच्या लाइफस्टाइलमध्ये बदल घडवून आणत नाहीत तोवर तुमचे हँडसम दिसण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. खाण्यापिण्यापासून तर झोपण्यापर्यंत सगळी काळजी घ्यायला हवी. आम्ही पुढे सोपे पांच फंडे देत आहोत तेवढे केले तरी तुम्हाला फरक दिसायला लागेल मंडळी!!
1) योग्य पद्धतीने चेहरा धुणे.
मंडळी जेव्हा तुम्ही चेहरा धुता, तेव्हा फक्त चेहरा साफ होत नसतो. तर डेड स्किन सेल, त्वचेत असलेला एक्स्ट्रा तेलकटपणा आणि घाण पूर्णपणे निघून जात असते. म्हणजे फक्त व्यवस्थित चेहरा धुण्याने खूप कामे होत असतात. म्हणून दिवसातून कमीत कमी 2 वेळा चांगला फेसवॉश वापरून चेहरा धुवायला हवा. मात्र यात एक गोष्टीची काळजी घ्यायला हवी. फेसवॉश लावण्याआधी चेहरा आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, मग त्यावर फेसवॉश लावा. याने पोअर्स म्हणजेच त्वचेच्या रंध्रांमधली अस्वच्छता बाहेर निघायला मदत होते. फेसवॉश लावल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवावा, जेणेकरून पोअर्स पुन्हा बंद होऊन चेहऱ्यात धूळ वगैरे घुसणार नाही.
2) योग्य मॉइश्चरायजर वापरा
चेहरा धुतल्यावर मॉइश्चरायजर लावणे पण खूप आवश्यक आहे. त्वचेतला तजेला हरवला असेल, तेव्हा तर याची खुपच गरज असते राव!! याने त्वचेतील मॉइश्चर लॉक होते. म्हणून मंडळी नेहमी चेहरा धुतला कि मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे. मॉइश्चरायझरचे महत्वाचे काम म्हणजे ते धूळ,कचरा आणि त्वचेच्यामध्ये ढाल बनून उभे राहते. मॉइश्चरायझरच्या योग्य उपयोगाने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वेळेआधी वय दिसणे या गोष्टी घडत नाहीत. यासाठी चेहरा धुतल्यावर एक चांगले मॉइश्चरायझर वापरणे चांगले आहे.
3) डेड स्किन हटवणे
चेहऱ्यावरील डेड स्किन हटवणे चेहऱ्यावर तजेला येण्यासाठी आवश्यक आहे मंडळी!! आणि या कामासाठी स्क्रब महत्वाचे साधन ठरू शकते. मंडळी, चेहरा धुवून साफ करणे गरजेचे आहे हे आपण बघितले, पण केवळ तो कायमस्वरूपी उपाय नाही. त्यासाठी खोलवर जाऊन त्वचेला हेल्दी ठेवणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही स्क्रबचा वापर सुरू करता, तेव्हा तुमच्या त्वचेवर तजेला आपोआप दिसायला लागतो. स्क्रबमुळे तुमच्या त्वचेला नविन सेल्स मिळायला लागतात. पण मंडळी, स्क्रबचा रोज वापरायचे नाही. आठवड्यातून दोनदा स्क्रब वापरले तरी ठीक आहे.
4) उन्हापासून दूर रहावे
मंडळी, सूर्यकिरणांपासून होणारे नुकसान लवकर भरून निघत नाही. चेहरा गोरा करणे कठीण आहे. पण चेहरा काळवंडायला वेळ लागत नाही राव!! कारण सूर्याची अल्ट्रा वायलेट किरणे चेहऱ्याला अक्षरशः जाळून टाकतात. याचसोबत डाग, रिंकल्स सगळे आपोआप यायला सुरवात होते. यासाठी उन्हापासून सहसा दूर राहणे हा एक उपाय आहेच, पण ते शक्य नसल्यास किमान उन्हात निघताना चांगले सनस्क्रीन लावून निघाले तर कधीही उत्तम!!
5) लाइफस्टाइल बदलणे
मंडळी, चांगले दिसणे जसे बाहेरून उपायांनी शक्य होते तसेच ते आपल्या शरीराच्या आतील बदलांनी सुध्दा शक्य होते. उलट आतील बदल जास्त परिणामकारक असतात. म्हणून तुम्हाला त्यासाठी खाणेपिणे, झोपणे यावर सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे राव!! त्यासाठी रोज ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. त्याचसोबत हेल्दी फूड म्हणजेच हिरव्या पालेभाज्या, फळे यांचे सेवन वाढवणे आवश्यक आहे. दिवसांत कमीत कमी ८ तास झोप व्हायला पाहिजे. तसेच ताणतणावापासून जेवढे दूर राहाल तेवढे फायदेशीर आहे.
मग, कशा वाटल्या या टिप्स? आपल्या राकट आणि दगडाच्या देशातले पुरुष देखणे दिसायला काय हरकत आहे? तुम्हांला काय वाटतं?
आणखी वाचा :
कोणत्याही काँस्मेटिक क्रीम्स शिवाय मिळवा तजेलदार त्वचा....करा हे ५ उपाय !!
सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सेलेब्रिटी करतात हे ९ उपाय!