चक्क ९६ वर्षांच्या आजींनी दिली परीक्षा....बघा बरं कोणती परीक्षा दिली त्यांनी !!

मंडळी, बातमी समजली का ? चक्क ९६ वर्षांच्या आजींनी ‘साक्षरता परीक्षा दिली आहे !!
तर, केरळच्या ‘अक्षरलक्षम’ साक्षरता मोहिमेंतर्गत ५ ऑगस्ट रोजी साक्षरता परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी तब्बल ४०,४४० लोकांनी वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा दिली. पण या सर्वांमधल्या एका व्यक्तीची देशभर चर्चा होत आहे. ही व्यक्ती आहे ‘कार्तीयानी अम्मा’. सर्वात वृद्ध परीक्षार्थी राव.
कार्तीयांनी अम्मा ९६ वर्षांच्या आहेत. त्यांनी केरळच्या चेप्पाडी भागातील शाळेत जाऊन ही परीक्षा दिली. परीक्षा १०० मार्कांची होती. साक्षरता परीक्षा असल्याने वाचायला व लिहायला येतं का ते तपासण्यात आलं आणि त्यासोबतच गणिताची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत पास होण्यासाठी कमीतकमी ३० मार्क्स गरजेचे आहेत.
राव, या आजीनी सहा महिन्यापूर्वीच ‘अक्षरलक्षम’ या साक्षरता मोहिमेसाठी आपलं नाव नोंदवलं होतं. केरळला १००% साक्षर करण्याच्या दृष्टीने ‘अक्षरलक्षम’ मोहीम सुरु करण्यात आली होती. या मोहिमेचं मुख्य लक्ष आहे १६-७५ वयाच्या नागरिकांची संपूर्ण साक्षरता. पण आश्चर्य म्हणजे परीक्षेला ९६ वर्षांच्या कार्तीयानी अम्मा सुद्धा आल्या. त्यांचा उत्साह बघून अनेकांना प्रेरणा मिळेल यात शंका नाही.
आणखी वाचा :
केरळ मध्ये तयार होत आहे 'जगातील सर्वात मोठं पक्षी शिल्प'..वाचा पूर्ण माहिती !!
काय आहे केरळमधल्या किस ऑफ लव्हचा किस्सा ? जाणून घ्या !