तुम्ही आठवड्यातून कितीवेळ फेसबुक वापरता ? स्वतः फेसबुकचं देईल उत्तर !!

मंडळी, तुम्ही दिवसातून कितीवेळ फेसबुक वापरता हे तुम्हाला माहित आहे का? दहा मिनिटं? पंधरा मिनिटं? एक तास? दोन तास??   एवढा विचार करू नका राव. तुम्ही फेसबुक कितीवेळ वापरता हे फेसबुक स्वतःच सांगणार आहे. फेसबुकसोबतच इन्स्टाग्रामवरसुद्धा ही माहिती मिळणार आहे.  पण कसं ? आम्ही सांगतो ना राव.

फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या अॅपमध्ये एक नवीन फिचर येणार आहे. हे फिचर नजीकच्या काळात आपल्या सर्वांच्या मोबाईलमध्ये असेल. आहे काय हे फिचर ?

१. फेसबुकवर या फिचरचं नाव असेल “Your Time on Facebook” तर इन्स्टाग्रामवर याला ‘Your Activity’ नाव असेल.

२. या फिचरमुळे तुम्ही आठवड्याभरात कितीवेळ फेसबुक/इन्स्टाग्रामवर होता आणि तुम्ही दररोज सरासरी किती वेळ घालवला याची माहिती मिळणार आहे.

स्रोत
३. यासाठी तुम्हाला अॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन “Your Time on Facebook”/‘Your Activity’ या ऑप्शनवर जावं लागेल. ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुमच्यासमोर आठवड्याभराचा आलेख दाखवला जाईल.

४. पण राव, या फिचरमुळे तुम्हाला फक्त अॅपवर घालवलेला वेळ दाखवण्यात येईल. तुम्ही जर ब्राउझरमध्ये फेसबुक वापरत असाल,  तर हे फिचर काम करणार नाही. 

५. यासोबत तुम्हाला ‘Set A Daily Reminder’ हा ऑप्शन मिळणार आहे. या ऑप्शनमुळे तुम्ही फेसबुक/इन्स्टाग्राम कितीवेळ वापरायचं याची मर्यादा निश्चित करू शकता. म्हणजेच एक प्रकारे अलार्म लावता येईल.

स्रोत

६. ठरवलेला अवधी पूर्ण झाला की तुम्हाला अॅपद्वारे सूचना देण्यात येईल. पण या ऑप्शनमुळे तुमचा अॅप बंद पडणार नाही बरं का. ठरलेली मर्यादा ओलांडली आहे हे सांगण्याचं काम फक्त अॅप करू शकतं, पण वापरणं बंद करण्यासाठी स्वतःच स्वतःला आवर घालावा लागेल.

७. लवकरच फेसबुक/इन्स्टाग्रामच्या अपडेटेड अॅपमध्ये या फिचरचा समावेश असेल.

८. तुमच्या माहितीसाठी सांगतो राव. अॅपल आणि अॅन्ड्रॉइडच्या नव्या ऑपरेटिंग सिस्टम्समध्ये अशाच प्रकारचा एक ऑप्शन इंस्टॉल करण्यात आलं आहे. आपण मोबाईलमधले कोणते अॅप कितीवेळ वापरतो याची अगदी अचूक माहिती या ऑप्शनमुळे मिळते. याशिवाय अॅप वापरण्याची मर्यादा सुद्धा ठरवता येते. या ऑप्शन समोर फेसबुक/इन्स्टाग्रामचं फिचर म्हणजे पानी-कम-चाय आहे राव.

स्रोत

मंडळी, तुम्हाला काय वाटतं, या अॅप कोणकोणते फायदे होऊ शकतात ? सांगा पटपट !!

 

आणखी वाचा :

फेसबुक, व्हाट्सअॅप, ट्विटर वापरण्यासाठी लागणार टॅक्स ??...पाहा बरं कोणत्या देशात आहे हा कायदा !!

फेसबुकने आणलं डेटिंग अँप, आता मेसेंजरमध्ये j1 झालं का विचारायची गरज नाही ना भाऊ !!

रेल्वे स्टेशनवर राहणाऱ्या या बेघर काकांना फेसबुकमुळे असा मिळाला मदतीचा हात !!

आता फेसबुकवरून करा मोबाईल रिचार्ज!! कसा ? वाचा मग स्टेप बाय स्टेप कृती

फेसबुकने डिलीट केलेत तब्बल एवढे फेक अकाऊंट...!!

सबस्क्राईब करा

* indicates required