फेसबुकने डिलीट केलेत तब्बल एवढे फेक अकाऊंट....!!

राव, भारताच्या स्वच्छता मोहिमेला फेसबुकने सिरीयसली घेतलेलं दिसतंय. कारण झुक्या भाऊने फेक अकाऊन्ट साफ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. फेक अकाऊन्ट बरोबर स्पॅम मेसेज सुद्धा साफ करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून फेसबुकच्या डाटा चोरीचं प्रकरण तापलेलं असताना या स्वच्छता मोहिमेचं स्वागत केलं जात आहे.

राव, या फेक अकाऊंटचा आकडा बघितला की समजतं फेसबुकवर किती फेका फेकी चालू होती. या स्वच्छता मोहिमेत तब्बल ५८.३ कोटी फेक अकाऊन्ट साफ करण्यात आले आहेत. त्याच बरोबर तब्बल ८३.७ कोटी स्पॅम मेसेज डिलीट करण्यात आलेत. या स्पॅम मेसेजेस मध्ये द्वेष पसरवणाऱ्या, अश्लील, दहशतवादी विचारांच्या आणि हिंसक गोष्टींचा समावेश आहे. ही सर्व साफसफाई गेल्या ३ महिन्यात केली गेली आहे.

याबद्दल स्वतः मार्क झुकेरबर्गने माहिती दिली आहे. अधिकृत माहितीनुसार जानेवारी पासून मार्च पर्यंत दररोज तब्बल ६५ लाख फेक अकाऊन्ट तयार केले जात होते. हे सर्व फेक अकाऊंटस रोखले गेले आहेत.

राव, मार्क झुकेरबर्गने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लोकांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता असल्याचं आश्वासन दिलं आहे. शेवटी फेसबुकला त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली हे महत्वाचं....

सबस्क्राईब करा

* indicates required