कोहिनूर जिथे सापडला त्याच खाणीतला हा ३००वर्ष जुना हिरा किती मौल्यवान आहे माहीत आहे ?

मंडळी, कोहिनूर जिथे सापडला त्या गोवळकोंडा खाणीतून आणखी एक हिरा ३०० वर्षांपूर्वी मिळाला होता. त्या हिऱ्याचा नुकताच लिलाव करण्यात आला आहे. या हिऱ्याला मिळालेली बोली बघून विश्वास बसणार नाही राव. हा हिरा विकला गेलाय तब्बल ४५ कोटी रुपयांमध्ये.

या हिऱ्याला ‘फार्नेस ब्ल्यू’ म्हणतात. १७१५ साली गोवळकोंडा खाणीतून तो सापडला होता. त्यानंतर त्याला स्पेनच्या राणीला नजर केलं गेलं. या राणीचं नाव एलिजाबेथ फार्नेस होतं. तिच्या नावावरूनच या हिऱ्याला त्याचं नाव मिळालं. त्याच बरोबर याचा निळा रंग सुद्धा नावात सामील केला गेला.

स्रोत

६.१६ कॅरेटचा हा हिरा स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे विकला गेला. त्याचा निळा रंग सर्वांना आकर्षित करत होता. या लिलावातील सर्वात महागड्या दागिन्यांमध्ये त्याचा समावेश होता. राव, ह्या हिऱ्याचं ऐतिहासिक महत्व देखील आहे. कारण १७१५ पासून ते आज पर्यंत हा हिरा अनेक राजघराण्यात फिरत होता. जवळ जवळ ७ पिढ्यांनी त्याला शाही खजिन्यात ठेवलं आहे.

मंडळी, निळ्या रंगातील या अप्रतिम हिऱ्याची चर्चा जगभर होत आहे.

 

आणखी वाचा :

हा गुलाबी हिरा विकला गेलाय तब्बल ४५० कोटी रुपयात !!

११,४०० कोटींचा घोटाळा करणारे कोण आहेत हे निरव मोदी ?

जगातली सगळ्यात महाग पर्स...24 कोटींची पर्स विकत घेणार का ?

 

सबस्क्राईब करा

* indicates required