व्हिडीओ ऑफ दि डे : स्फोटात गमावलेला पाय कृत्रिमतेने परत मिळाल्यावर या मुलाने काय केलं ते पाहा!!

अफगाणिस्तान गेली अनेक वर्षे युध्दाच्या वेढ्यात फसलेलं आहे. अमेरिका २००१ मध्ये अफगाणिस्तानात घुसली आणि तेव्हा पासून बॉम्ब, हवाई हल्ला, भूसुरुंग स्फोट हे सगळं तिथे रोजचंच झालं आहे. अगदी जीवनाचा भागच बनून गेलं आहे. पण या सगळ्या युध्दाचा परिणाम सगळ्यात जास्त कुणावर झाला असेल तर तिथल्या मुलांवर. UNAMA या संस्थेने दिलेल्या आकड्यानुसार २०१८ पासून आजवर एकूण ९२७ अफगाणी मुलांचा मृत्यू झाला आहे. 

(स्रोत)

आज आम्ही जो व्हिडीओ घेऊन आलो आहोत त्यात दिसणारा मुलगा पण या युद्धाला बळी पडला होता. अशा परिस्थितीत कोणीही माणूस निराश होईल, पण या पोराने जे केलं त्याने सगळ्या जगाला नवी उर्जा मिळाली आहे भाऊ. पाहा हा व्हिडीओ.

हा व्हिडिओ आहे अहमद नावाच्या मुलाचा. एका भूसुरुंग स्फोटात त्याने आपला पाय गमावला होता. त्याला काबूलमधल्या आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस या संघटनेमध्ये कृत्रिम पाय बसवण्यात आला. आपल्याला कोणत्याही आधाराशिवाय उभे राहता येते हे जेव्हा त्याला समजलं तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि तो चक्क नाचायला लागला.

(स्रोत)

मंडळी, या व्हिडीओद्वारे अफगाणिस्तानमधली परिस्थिती सगळ्या जगासमोर येत आहे. इथे मुलं आपले आयुष्य मुक्तपणे जगू शकत नाहीत. हे युद्ध थांबले पाहिजे असा लोकांचा सूर आहे. त्याहीपेक्षा आम्हाला आवडलं आहे ते म्हणजे या मुलाचा निरागसपणा आणि त्याची सकारात्मक उर्जा. 

 

मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ आम्हाला नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required