विमानाचं तिकीट काढून भीक मागणारा भिकारी....वाचाच हा किस्सा !!

Subscribe to Bobhata

मंडळी, भारतात भिकारी कुठे कुठे सापडतात ? मंदिरात, रस्त्यावर, रेल्वे स्टेशनवर, बस स्थानकावर, पुलावर, फुटपाथवर. पण तुम्ही कधी भिकाऱ्याला विमानात भीक मागताना पहिला आहे का ?

राव, आजपर्यंत भारतातच काय, जगभरातसुद्धा असं कधी घडलं नव्हतं. पण कतार एअरवेजच्या विमानात हे खरंच घडलं आहे. एक भिकारी चक्क विमानात शिरला आणि त्याने भीक मागितली. राव, आपल्याकडे कसं भिकाऱ्यांना रेल्वेने फुकट प्रवास करता येतो, तसा प्रकार इथे घडला नाही. त्या भिकाऱ्याने  भीक मागण्यासाठी रीतसर विमानाचं तिकीटही काढलं होतं. विमान सुरु झाल्यानंवर तो विमानातील प्रत्येकाकडे एक प्लास्टिक पिशवी घेऊन गेला. एका प्रवाशाने तर त्याला नोटही काढून दिली.

स्रोत

कतार एअरवेजच्या विमानाने दोहाहून इराणच्या शिराज विमानतळाच्या दिशेने उड्डाण केलं होतं. टेकऑफच्यावेळी तो जागेवरून उठला आणि त्याने भीक मागायला सुरुवात केली. हवाई सुंदरीने या महाशयांना आपल्या सीटवर बसण्याची विनंती करूनही त्याने ऐकलं नाही. इतर स्टाफ मेम्बर्स देखील तिथे आले. यानंतर मात्र तिथे शाब्दिक चकमक उडाली. राव, या सगळ्यामध्ये विमान उशिराने पोहोचलं.

या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सुरुवातीला कराची ते बँकॉक फ्लाईटमध्ये एका पाकिस्तानी भिकाऱ्याने हा प्रकार केल्याची अफवा पसरत होती. पण पुढे जाऊन पाकिस्तानने हे खोटं असल्याचा खुलासा केला. 

आता प्रश्न पडतो ह्या भिकाऱ्याकडे विमानाचं तिकीट घेण्यासाठी पैसे कसे आले? उत्तरही सोपं आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या एका भिकाऱ्याचे ४-५ फ्लॅट्स आणि रोजची कमाई सुमारे ७५,०००रुपये असल्याच्या बातम्या आल्या होत्या. अशा विनाभांडवली आणि टॅक्सफ्री धंद्यात एखाद्या भिकाऱ्याकडे इतके पैसे असणे सहज शक्य आहे हो...

आता मात्र विमानातही 'परदेसी परदेसी जाना नहीं' ऐकायची तयारी ठेवा मंडळी !!

सबस्क्राईब करा

* indicates required