आता बोभाटा होणार Spotify, Gaana, JioSaavn, Amazon Music यावर, आजच ऐका बोभाटाचा नवीन पॉडकास्ट: घोटाळ्यात घोटाळा

आजवर आम्ही आपल्यासाठी विविध विषयातील माहिती लिखित स्वरूपात घेऊन आलो आहोत.  आता मात्र आम्ही एका वेगळ्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहोत. बोभाटा आता तुमच्यासाठी घेऊन येतंय पॉडकास्ट. म्हणजेच आता बोभाटाचे ज्ञानरंजन तुम्ही ऐकूही शकता. आज आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत आमचा पहिला पॉडकास्ट शो "घोटाळ्यात घोटाळा". या शोमधे आम्ही वेगवेगळ्या फ्रॉड्स आणि स्कॅमबद्दलची माहिती तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत.  सगळ्यात महत्वाचे म्हणजे आता बोभाटा फेसबुक, आमची साईट या सहित  गाना, जिओ सावन, अमेझॉन म्युसिक, स्पॉटीफाय अशा स्ट्रीमिंग ऍपवर उपलब्ध असणार आहे.  जसे आजवर तुम्ही आमच्या लेखानाला प्रतिसाद दिला तसा आता आमच्या या नव्या प्रयोगालाही द्यावा हीच इच्छा.

 

घोटाळ्यात घोटाळा: शेअर बाजार, बँका, पर्यटन स्थळ आणि अशा इतर घोटाळ्यांची आणि फसवणुकीची गोष्ट सांगणार मराठी पॉडकास्ट.

भाग १: मुंबई शेअर बाजारातला १८६२ पहिला घोटाळा 

शेअर बाजारातील घोटाळा म्हणल्यावर तुमच्या डोळ्यासमोर कोणते नाव येते? हर्षद मेहताचेच आले ना? पण आज आम्ही हर्षद मेहताच्या घोटाळ्याची गोष्ट सांगणार नाही. तर आम्ही गोष्ट सांगत आहोत शेअर बाजारातील पहिल्या घोटाळ्याची. गंमत अशी आहे की १८६२ च्या दरम्यानच्या ह्या घोटाळ्यात आणि हर्षद मेहताच्या १९९२ घोटाळ्यात काहीही फरक नाही. फक्त इसवी सनाचे आकडे बदललेले दिसतील, नावं वेगळी दिसतील, बाकी ज्याला 'मोडस ऑपरेंडी' म्हणजे गुन्हा करण्याची पध्दत म्हणतात, ती आहे तशीच आहे. चला तर, आज ऐकूया मुंबई शेअर बाजाराच्या आद्य घोटाळेबाज प्रेमचंद रायचंदच्या 'बॅकबे रेक्लेमेशन ' फ्रॉडबद्दल!!

हा पॉडकास्ट तुम्ही खालील ठिकाणी ऐकू शकता:

 

Spotify:  स्पॉटिफाय 

HubHopper:  हबहॉपर 

Gaana:   गाना 

JioSaavn: जिओ सावन  

Amazon Music: अमेझॉन प्राईम म्युसिक

Google Podcast: गुगल पॉडकास्ट

पुढच्या शनिवारी पुढचा भाग घेऊन येणार आहोत, तोवर जर तुम्हाला हा लेख वाचायचा असेल तर इथे भेट द्या.

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required