ब्रिटिशांनी भारतातील तब्बल एवढ्या किमतीची संपत्ती लुटली....आकडा पाहून चक्कर येईल !!

ब्रिटिशांनी भारतातली संपत्ती लुटली, पण नक्की किती प्रमाणात ? माहित आहे का ? खरं तर याचं नक्की प्रमाण आजवर कोणाला सांगता आलं नव्हतं, पण आता याचं गणिती उत्तर मिळालं आहे. उत्सा पटनायक यांनी आपल्या अभ्यासातून ब्रिटिशांनी भारताची किती संपत्ती लुटली याचा आकडा शोधला आहे. चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

उत्सा पटनायक  (स्रोत)

उत्सा पटनायक यांनी ‘Dispossession, Deprivation and Development’ हा शोधनिबंध सादर केला आहे. या शोधनिबंधात दिलेल्या माहितीनुसार ब्रिटिशांनी १७६५ ते १९३८ या काळात भारताला ४५ ट्रिलियन डॉलर्स म्हणजे तब्बल ३.२ लाख कोटी रुपयांनी लुटलं. यासाठी उत्सा पटनायक यांनी १७६५ ते १९३८ दरम्यानच्या चार वेगवेगळ्या आर्थिक कालावधींचा अभ्यास केला आहे. प्रत्येक कालावधी दरम्यान बाहेर गेलेली संपत्ती किती ते मोजून त्यांनी हा आकडा शोधला आहे.

ही लुट कशी माजली होती याचं एक उदाहरण त्या असं देतात.

स्रोत

ब्रिटीश काळात कर भरमसाठ वाढले होते. ब्रिटिशांनी भारतात पिकणारं अन्नधान्य ब्रिटनला पाठवण्याचा चंग बांधला होता. (महायुद्धाच्या काळात हे प्रमाण सर्वाधिक होतं.) दरडोई अन्नधान्याचा वार्षिक खप हा १९०० साली २०० किलोग्रॅम होता तर तोच दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १३७ किलोग्रॅम एवढा खाली घसरला. या कारणाने असंख्य भारतीय नागरिकांचा बळी गेला.  

मंडळी, दुसरं महायुद्ध भारताच्या भूमीवर लढलं गेलं नसलं, तरी हा अप्रत्यक्षपणे युद्ध बळीच म्हणता येईल.

स्रोत

उत्सा पटनायक यांनी आणखी माहिती देताना सांगितलं आहे, की ब्रिटिशांनी केंद्र शासनाच्या बजेट मधला २६ ते ३६ टक्के वाटा घेतला. त्यांच्या मते हे पैसे भारतात राहिले असते तर भारतीयांना स्वातंत्र्यानंतर आर्थिक बळ मिळालं असतं. त्यांनी दिलेल्या माहितीत ब्रिटिशांनी लादलेल्या कर्जाबद्दल माहिती दिलेली नाही. कर्जाच्या आकड्याने या माहितीत आणखी भर पडली असती.

तर मंडळी, ब्रिटीश कालखंडाचा अभ्यास करून भारतातल्या संपत्तीच्या लुटीचा आकडा कदाचित पहिल्यांदाच मांडण्यात आलाय. याबद्दल उत्सा पटनायक यांच्या संशोधनाचं कौतुक करू तेवढं कमीच आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required