computer

फिलिपाईन्सच्या कोलाची जाहिरात बघून लोकांचा गोंधळ का उडालाय? तुम्ही पाहा !!

लोकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरातीत नववीन कल्पना मांडल्या जातात. नव्या पद्धतीने प्रोडक्ट लोकांसमोर आणलं जातं. याबाबतीत फेव्हीकोल सगळ्यांच्या पुढे आहे. अमूलने आपल्या अमूल बेबीच्या मार्फत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. सध्या लोकांना याही पेक्षा नवीन काहीतरी हवंय. कदाचित हीच मागणी लक्षात घेऊन फिलिपाईन्सच्या एका  कंपनीने आपली जाहिरात आणली आहे. ह्या जाहिरातीला जगावेगळी म्हटलं तरी हरकत नाही.

ही जाहिरात फिलिपाईन्सच्या RC Cola नावाच्या सॉफ्ट ड्रिंक कंपनीची आहे. RC Cola ने नुकतीच एक जाहिरात युट्युबवर अपलोड केली. ही जाहिरात अनेकांच्या डोक्यावरून गेली तर, काही लोक या जाहिरातीत खूप मोठा अर्थ असल्याचं म्हणतायत. आम्ही आमचं मत मांडणार नाही. बोभाटा वाचकांना काय वाटतं हे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगावं.

जाहिरात फिलिपिन्स भाषेत असल्याने आम्ही जाहिरात समजावून सांगतो.

तर, गोष्टीला सुरुवात होते तेव्हा एक मुलगा नुकताच शाळेतून घरी आलेला आहे. तो आईला विचारतो की मला दत्तक घेतलंय का? आई ‘नाही’ म्हणते. त्यावर तो विचारतो की मग माझ्या पाठीवर हे चार ग्लास का आहेत? तो शर्ट काढतो तेव्हा त्याच्या पाठीवर खरोखर चार ग्लास चिकटलेले असतात. यानंतर आई एवढे दिवस लपवलेलं सत्य मुलासमोर उघड करते. ती आपलं डोकं धडावेगळं करते. तिच्या डोक्याच्या जागी  RC Cola ची बाटली आहे. शेवटच्या दृश्यात सर्व कुटुंब मिळून RC Cola पिताना दिसत आहेत.

आहे की नाही विचित्र? काही लोक म्हणतायत यातून आईचं प्रेम दिसतं, तर काही लोक आणखी वेगळा अर्थ शोधतायत. आता तुम्हीच पाहा ही जाहिरात आणि तुम्हाला काय अर्थ लागतोय ते सांगा.  

सबस्क्राईब करा

* indicates required