हा बाप आपल्या बच्चे कंपनीच्या डोक्यातील कल्पना सत्यात उतरवतोय...हे १५ नमुने पाहा !!

लहान मुलांच्या चित्रांना खरं रूप देण्याचा विचारच भन्नाट आहे. हे काम लंडनच्या Tom Curtis यांनी केलं आहे. त्यांचं इन्स्टाग्रामवर ‘Things I Have Drawn’ नावाचं पेज आहे. या पेजच्या माध्यमातून ते लहान मुलांची चित्रं खऱ्या आयुष्यात कशी दिसतील हे दाखवतात.
याची सुरुवात त्यांच्या घरातूनच झाली. त्यांनी त्यांच्या दोन मुलांच्या चित्रांना फोटोशॉपच्या माध्यमातून खरं रूप दिलं होतं. ही चित्रं लोकांना प्रचंड आवडली. आता ते इतर लहानग्यांच्या चित्रांचाही वापर करतात. लहान मुलांच्या चित्रांना नवं रूप देऊन त्यांनी एका नवीन कलाकृतीला जन्म दिला आहे.
आज आम्ही Tom Curtis यांच्या कामाचे निवडक नमुने बोभाटाच्या वाचकांसाठी आणले आहेत. बच्चे कंपनीच्या डोक्यातील कल्पना सत्यात उतरलेल्या पाहून मोठेही नक्कीच खुश होतील. चला तर या कलाकृत्या पाहूया.