computer

९ जानेवारी: आजच्याच दिवशी पहिल्या आयफोनची घोषणा झाली होती...वाचा या ५ गोष्टी !!

२०२० मध्ये आयफोनची १२ वी पिढी जन्माला आली. पण आयफोनच्या कुळाची सुरुवात ९ जानेवारी २००७ साली झाली. 

९ जानेवारी २००७ रोजी म्हणजे आजपासून १४ वर्षांपूर्वी ऍपलच्या स्टीव्ह जॉब्स यांनी पहिल्या आयफोनची घोषणा केली. 

फेब्रुवारी २५, २००७ रोजी ७९ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आयफोनची पहिली जाहिरात Hello प्रदर्शित करण्यात आली.

जून २८, २००७ स्टीव्ह जॉब्स यांनी ऍपलच्या सर्व कर्मचाऱ्यांना आयफोन मोफत देण्याची घोषणा केली. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता आयफोन बाजारात विक्रीस उपलब्ध झाला. संपूर्ण अमेरिकेत दुकानांसमोर शेकडो लोकांच्या रांगा होत्या.

आयफोनकडे स्वतःचे iphone.com हे डोमेन नव्हते हे त्यांना मायकेल कोवॅच नावाच्या माणसाकडून १० लाख डॉलर्स देऊन विकत घ्यावे लागले. 

आयफोन भारतात येण्यासाठी ऑगस्ट २००८ साल उजाडावे लागले. त्यावेळी आयफोनची किंमत होती ३१००० (4GB) आणि ३६,१०० (8GB). पहिला आयफोन मिळवण्याचा मान स्वाती नावाच्या दिल्लीतल्या एका विद्यार्थिनीला मिळाला.

सबस्क्राईब करा

* indicates required