computer

ओळख जिल्ह्यांची: शिरपूर पॅटर्न, अहिराणी भाषा ते NH६०...धुळे जिल्ह्याची वैशिष्ट्ये जाणून घ्या!!

खानदेशातील तीन जिल्ह्यांपैकी महत्वाचा जिल्हा म्हणजे धुळे. धुळे या शहराची निर्मिती खुद्द भारतरत्न मोक्षगुंडम विश्वश्वरैय्या यांनी केली होती. सातपुडा डोंगररांगांच्या पायथ्याशी वसलेल्या धुळे जिल्ह्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

रस्ते:

धुळे जिल्ह्यातून जाणारे महामार्ग हे धुळे जिल्ह्याचे मोठे वैशिष्ट्य आहेत. पुणे आणि धुळेला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग NH६०, तसेच मुंबई आग्रा, सोलापूर असे महामार्ग धुळे जिल्ह्यातून जात असल्याने हा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दळणवळण होत असते. रेल्वेच्या बाबतीत पण धुळे उजवा आहे. जिल्ह्यातून गुजरातमध्ये रेल्वेच्या माध्यमातून होणारी वाहतूक महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना जोडत असते.

भाषा:

धुळे जिल्ह्यात बोलली जाणारी अहिराणी भाषा ही राज्यभर कुतूहलाचा विषय आहे. अहिराणी भाषा जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिकचा बराचसा भाग यात बोलली जाते. धुळ्यात बहुसंख्य लोक अहिराणी भाषेतच संभाषण करतात.

नद्या आणि शेती:

धुळे जिल्ह्यात अनेक नद्या वाहतात, पण तरी या जिल्ह्यात कोरडवाहू शेतीचे प्रमाण मोठे आहे. तापी नदी धुळ्यातून वाहते. तसेच अमरावती, बुराई, अनेर, कान अशा नद्या या जिल्ह्यातून वाहतात. पाण्याच्या बाबतीत क्रांतिकारी ठरलेला शिरपूर पॅटर्न हा धुळे जिल्ह्यातच झाला होता हे देखील तितकेच महत्वाचे आहे. धुळे जिल्ह्यात इतर महाराष्ट्रासारखेच पारंपरिक पिके घेतली जातात. कापूस, ज्वारी, बाजरी, मिरची अशा पिकांचा त्यात समावेश करता येऊ शकतो.

प्रकल्प:

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात सध्या जागतिक स्तराचा सौरऊर्जा प्रकल्प होऊ घातला आहे. हा प्रकल्प पर्यावरण आणि इतरही गोष्टींसाठी महत्वाचा असला तरी धुळ्याची ओळख जगभर जाण्याच्या दृष्टीने पण महत्वाचा ठरू शकतो. धुळे जिल्ह्यातील एमआयडीसी पण प्रगत म्हणावी अशी आहे. अनेक लोकांना तिथे रोजगार प्राप्त होत आहे.

पर्यटन:

पर्यटनाच्या बाबतीत धुळे येथील लळींगचा किल्ला आणि धबधबा पर्यटकांना आकर्षित करत असतो. साक्री तालुक्यातला आमळी येथील धबधबाही पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. अनेर येथे असलेले अभयारण्य आणि धरण निसर्गप्रेमींसाठी एका दिवसाची ट्रिपसाठी मजेशीर ठरू शकते. या ठिकाणी विविध प्राणी पक्षी दिसायला मिळत असतात. धार्मिक स्थळांमध्ये एकविरा मातेचे मंदिर हे भाविकांसाठी मोठे श्रद्धास्थळ आहे. एकविरा मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची सातत्याने येथे गर्दी पाहायला मिळत असते.

धुळे जिल्ह्याची ही माहिती तुम्हाला आवडल्यास आपल्या धुळेकर मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका...

सबस्क्राईब करा

* indicates required