computer

आता वायफाय वापरून व्हिडीओ आणि फोन कॉल करा...जिओच्या नवीन फिचरबद्दल जाणून घ्या !!

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा आणली आहे. या सुविधेचं नाव आहे ‘जिओ वायफाय कॉलिंग’. ‘जिओ वायफाय कॉलिंग’वापरून तुम्हाला आता वायफायद्वारे व्हिडीओ कॉल आणि फोन कॉल करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ही सुविधा मोफत आहे. जिओ मागच्या ५ महिन्यांपासून या सुविधेवर या सुविधेवर काम करत होतं. आता ही सुविधा देशातल्या प्रमुख १५० स्मार्टफोन्सवर उपलब्ध आहे.

पण ‘जिओ वायफाय कॉलिंग’ कसं वापरायचं ? त्यासाठी काय करावं लागेल? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे या लेखात जाणून घेऊया.

जिओ वायफाय कॉलिंगबद्दल ५ महत्त्वाच्या गोष्टी :

१. ही सुविधा वापरण्यासाठी तुमच्या फोनवर Wi-Fi calling service उपलब्ध असणं गरजेचं आहे.

२. तुम्हाला कोणत्याही वायफाय कनेक्शनद्वारे जिओ वायफाय कॉलिंग वापरता येऊ शकतं.

३. मोबाईल नेटवर्क खराब असलेल्या भागात जिओ वायफायद्वारे तुम्हाला फोन कॉल करता येऊ शकतो.

४. वॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये VoLTE  वरून Wi-Fi असा बदल होईल. हा बदल होत असताना कॉलिंगमध्ये अडथळा येणार नाही.

ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे, पण तुमच्या फोनवर जिओ टेरिफ प्लॅन अॅक्टिव्ह असणं गरजेचं आहे.

 

आपल्या फोनवर जिओ वायफाय कॉलिंग सुविधा कशी सुरु करायची ?

१. फोन ‘Settings’ मध्ये जाऊन ‘Connections’ पर्याय निवडा.

2. यानंतर तुमच्यासमोर वेगवेगळे पर्याय दिसतील. यापैकी ‘Wi-Fi Calling’ पर्याय शोधा

३. ‘Wi-Fi Calling’वर क्लिककरून सुविधा सुरु करा.

वायफाय कॉलिंगबद्दल जिओचं नाव घेतलं जात असलं तरी ही सुविधा पहिल्यांदा आणण्याचं श्रेय एअरटेलला जातं. एअरटेलने डिसेंबर २०१९ च्या पहिल्या आठवड्यापासून आपल्या युझर्सना वायफाय कॉलिंग सुविधा देऊ केली होती. एअरटेल आणि जिओ मध्ये फरक एवढाच की एअरटेलची सुविधा कमी स्मार्टफोन्सवर उपलब्ध आहे, तर जिओची सुविधा १५० प्रकारच्या स्मार्टफोन्सवर उपलब्ध आहे.

कोणकोणत्या फोनवर जिओ वायफाय कॉलिंग वापरता येऊ शकतं हे जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://www.jio.com/en-in/jio-wifi-calling

 

चला तर तुमच्या फोनवर जिओ वायफाय कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे का हे पाहून घ्या.