या शेतकऱ्याने गायीने दूध जास्त द्यावे म्हणून तिला चक्क VR गॉगल्स घातले!!

गायीने अधिकाधिक दूध द्यावे म्हणून शेतकरी अनेक युक्त्या वापरत असतात. दूध काढत असताना सुमधुर संगीत चालू असेल तर गायी-म्हशी अधिक दूध देतात असेही सांगितले जाते. पण आता या कामात टेक्नॉलॉजी मदतीला धाऊन आली आहे.

टर्कीतल्या एका शेतकऱ्याने चक्क गायीला VR गॉगल्स लावले. या गॉगल्समुळे गायीला आपण एखाद्या जंगलात फिरत असल्याचा भास होईल आणि त्यामुळे ती अधिक दूध देईल ही त्याची नामी युक्ती खरोखर कामी आली आहे.

इजेत कोकाक नावाचा हा शेतकरी आहे. एके ठिकाणी त्याने VR गॉगल्स आणि गायीचे दूध याबद्दल गोष्ट ऐकली आणि आपल्या दोन्ही गायींसाठी तो हे गॉगल्स घेऊन आला. याचा फायदा असा झाला की दिवसाला गायी २२ लिटरवरून थेट २७ लिटर दूध देऊ लागल्या.

हा इजेत सांगतो की, "गायींना घराऐवजी हिरवागार निसर्गाच्या दिसला तर त्यांचा तणाव कमी होतो, त्यामुळे त्यांच्या दुधात वाढ होते". काहींनी तर या घटनेची तुलना थेट मॅट्रिक्स सिनेमसोबत केली आहे. एक जण लिहितो, "झोपेतून जागे झाल्यावर जेव्हा आजूबाजूला हिरवा निसर्ग दिसेल तेव्हा किती भारी वाटेल? तो अनुभव यातून मिळतो."

हे गॉगल्स पहिल्यांदा मॉस्को येथे शेतीसाठी तयार करण्यात आले होते. गॉगल्स डेव्हलप करणाऱ्यांसोबत शेतकऱ्यांनीही काम केले आहे. यातून पशूंना आपण एखाद्या जंगलात असल्याचा भास होतो. यासंबंधात रशियात बरेच संशोधनही झाले आहे. त्यातून लागलेला एका शोध म्हणजे ती म्हणजे गायी निळ्या किंवा हिरव्या रंगछटांपेक्षा लाल छटा अधिक चांगल्याप्रकारे ग्रहण करतात. या लालछटांमुळे त्यांना चिंता आणि तणावाची तीव्रता कमी प्रमाणात जाणवते.

हे सगळं खरं, पण VR तंत्रज्ञान म्हणजे काय?

VR म्हणजे व्हर्चुअल रिऍलिटी. मराठीत याला आभासी वास्तव म्हणता येऊ शकते. यात काय होते की, जेव्हा तुम्ही VR टेक्नॉलॉजीचा गॉगल लावता किंवा तो गॉगल लावून एखादा VR व्हिडिओ पाहता, त्यावेळी तुम्हाला जे दिसते ते आभासी असूनही ते प्रत्यक्ष असल्याचा भास होतो. 3D पिक्चर बघताना येणाऱ्या अनुभवापेक्षाही अधिक जवळचा हा अनुभव असते. म्हणजे तुम्ही जर एखाद्या घसरगुंडीचा व्हिडिओ यातून बघितला तर तुम्हाला आपण खरंच घसरगुंडीवरून घसरतो आहोत असे वाटेल. प्लेस्टोअरवर बरेच VR गेम्स आहेत आणि युट्यूबवरतीही बरेच VR व्हिडिओ तुम्हांला सापडतील. ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर चांगल्या दर्जाचे VR सेटस दोन-अडीच हजारांपर्यंत मिळतात. तेच VR कार्डबोर्डबॉक्स घेतलात तर ५०० रुपयांपर्यंतही तुम्हांला तो मिळून जाईल.

ऑगमेंटेड-व्हर्च्युअल रिॲलिटीबद्दल आणखी वाचा:

 

मराठी माणसाने बनवलेले भारतातील पाहिले स्मार्ट नोटबुक...

आयआयटी मुंबईचा आगळावेगळा, तांत्रिक पदवीदान सोहळा!! प्रमुख पाहुणे, शिक्षक आणि विद्यार्थी सर्वांचे साकार झाले डिजिटल अवतार!!

लॉकडाऊनच्या काळात, वाघ-सिंह-पांडा-शार्क मोबाइलवरून येतील थेट तुमच्या घरात!!

असो, सध्यातरी हा शेतकरी आणि त्याची गाय जगभर गाजत आहेत. पण विज्ञान शाप की वरदान हा प्रश्न आणि अति तेथे माती ही लहानपणापासून मिळालेली शिकवण या दोन्ही गोष्टी माणसाने नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत!!.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required