computer

अंदमान निकोबार मध्ये इतिहासात पहिल्यांदाच धावणार रेल्वे....वाचा संपूर्ण माहिती एका क्लिकवर !!

(प्रातिनिधिक फोटो)

अंदमान आणि निकोबार बेटे भारताचा भाग आहेत.  पण जेवढे आपण देशातल्या इतर राज्यांशी जोडलेले आहोत,  तेवढे अंदमान-निकोबार बेटांशी जोडलेले वाटत नाहीत. त्याला कारणे पण आहेत म्हणा. अंदमानचा समुद्र काळे पाणी म्हणून ओळखला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ब्रिटिशांना सर्वात जास्त त्रास देणाऱ्या कैद्यांना अंदमानच्या तुरुंगात ठेवले जायचे. मंडळी, असे म्हणतात कि एकदा जो माणूस अंदमानच्या जेलमध्ये जायचा तो परत यायचा नाही, एवढी कडक शिक्षा तिथे दिली जात असे. अर्थात आपल्या देशात ईशान्य भारतातल्या राज्यांबद्दलसुद्धा हवी तेवढी आपुलकी दाखवली जात नाही मंडळी!! आपल्याच देशातील लोकांना चीनी म्हणवून हिणवले जाते. असो. 

अंदमान-निकोबार बेटे बंगालच्या उपसागराने वेढलेली आहेत. सहलीला जाण्यासाठी ती उत्तम जागा आहे. तसंही अनेक लोकांना अंदमानबद्दल एक आकर्षण आहे.पण तरीही आजही अंदमानमध्ये पाहिजे तेवढ्या सोयी नसल्याने इच्छा असूनसुद्धा अनेकांना तिथे जाता येत नाही. पण आता तुमची ईच्छा पूर्ण होणार आहे मंडळी!! जसे देशातील इतर राज्यांमध्ये फिरणे सोपे आहे, तशी अंदमानची सफरसुद्धा  आनंददायक होणार आहे. आजपर्यंत अंदमानच्या लोकांचे रेल्वेत फिरण्याचे स्वप्न अपूर्ण राहत होते. आणि इकडच्या लोकांना सुद्धा तिथे रेल्वे नसल्याने फिरण्याचा त्रास होत होता.  पण आता अंदमानमध्येसुद्धा झुकझुक गाडीचा आवाज ऐकू येणार आहे. अंदमानमध्ये रेल्वे सुरु होतेय भाऊ!!.

अंदमानचे बीच म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग ना राव!! अंदमानला निसर्गाने वरदान दिले आहे. अंदमान सुंदरतेच्या बाबतीत जगात आघाडीवर आहे. आणि आता तर मनसोक्त अंदमानच्या बीचवर तुम्हाला फिरता येईल. म्हणून तर तिथे रेल्वे सुरु होतेय ही गोष्ट सगळ्यांसाठी गुड़ न्यूज आहे. अंदमानच्या दिगलीपुर ते पोर्टब्लेअरच्या दरम्यान ही रेल्वे धावणार आहे. एखाद्या बेटावर पहिल्यांदाच रेल्वेमार्ग टाकण्यात येत आहेत.

अंदमानच्या किनाऱ्यालगत असणारा हा रेल्वेमार्ग २४० किलोमीटरचा असणार आहे. रेल्वेमार्गात आधुनिक स्टेशन्स आणि पूल उभारण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्याची तिथे सुरु असलेली बस सेवा खुप हळू आहे. तिथे फक्त ३५ किलोमीटर अंतर कापायला तब्बल १४ तास लागतात.  समुद्री मार्ग वापरला तर त्याच प्रवासासाठी २४ तास लागतात. हा वेळ खूप वाटत असला तरी तो परिसरच तसा असल्याने इतका वेळ लागणे साहजिक आहे. पण एकदाची रेल्वे  सुरु झाली की हा प्रवास ३ तासांनी कमी होईल. मंडळी, या रेल्वेमुळे तिथे फिरायला जाणाऱ्या लोकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणाऱ आहे. या रेल्वेमार्ग उभारणीच्या कामासाठी खर्च मात्र प्रचंड येणार आहे. खर्च येत असला तरी तिथे टुरिझम विकसित होऊन तिथल्या हातांनासुद्धा रोजगार मिळेल हे ही तितकंच महत्त्वाचं आहे. 

मंडळी,  या रेल्वेमार्गाचा फिरायला येणाऱ्यांना आणि तिथल्या स्थानिक लोकांना फायदा तर होईलच, पण एकंदरीत भारताचा सुद्धा मोठा फायदा होणार आहे. आजवर अंदमानसोबत असलेला जो काही थोडाफार दुरावा आहे, तो यामुळे कमी होईल. तसेच तिथले उद्योगधंदे वाढतील. देशातल्या-परदेशातल्या पर्यटकांना आपल्या देशातला एवढा सुंदर परिसर पाहायला मर्यादा येत होत्या. आता सगळेजण अंदमानचा मनसोक्त आनंद घेऊ शकतील. सर्वात महत्वाचे म्हणजे हा प्रकल्प आपल्या आर्मीसाठी सुद्धा महत्वपूर्ण ठरणार आहे. दिगलीपूरपासून फक्त ३०० किलोमीटरवर असल्याने तिथल्या बऱ्याच गोष्टींवर लष्कराला नियंत्रण मिळवता येणार आहे.

तर मंडळी, कधी अंदमानला फिरायला जाण्याचा प्लॅन करणार की नाही?  आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required