f
computer

कचऱ्याच्या बदल्यात बियर मिळत आहे ?? पत्ता लिहून घ्या भाऊ !!!

गोव्यात दरवर्षी ७० लाख पर्यटक येत असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा राबता असतो म्हणजे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात प्रदूषणही आलंच. गोव्यात सध्या कचऱ्याची समस्या शिगेला पोहोचली आहे. हा प्रश्न सोडवायला सरकारी यंत्रणाही कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकच काहीतरी भन्नाट आयडिया शोधून काढतात. गोव्यातही कचरा प्रश्नावर असाच उपाय शोधण्यात आला आहे. गोव्यात कचऱ्याच्या बदल्यात चक्क फुकट बियर दिली जात आहे भाऊ.

चला तर या भन्नाट कल्पनेविषयी जाणून घेऊ या !!

ही कल्पना शोधून काढली आहे द्रीष्टी मरीन या खाजगी बीच व्यवस्थापिकेने. तिने “तेरा मेरा कॅम्पेन” नावाची एक मोहीम राबवली आहे. या मोहिमेंतर्गत तिने ‘वेस्ट बार’ (Waste Bar) सुरु केलं आहे. या बार मध्ये ग्राहकांना प्लास्टिक, सिगरेटची थोटके, प्लास्टिक स्ट्रॉ अशा कचऱ्याच्या बदल्यात बियर किंवा कॉकटेल दिलं जात आहे.

१० बियरची झाकणं किंवा सिगरेटच्या २० थोटकांच्या बदल्यात १ बॉटल बियर दिली जात आहे.   याखेरीज ५ प्लास्टिक स्ट्रॉच्या बदल्यातही एक बियर मिळते.

सध्या फक्त गोव्याच्या उत्तरेच्या बागा बीचवर असलेल्या  Zanzibar shack मध्ये ‘वेस्ट बार’ सुरु करण्यात आलंय. लवकरच या भागात आणखी असे बार सुरु होतील. तशी योजना आखण्यात आली आहे.

मंडळी, या कल्पनेची खरी सुरुवात ही नेदरलॅंड देशात गेल्यावर्षी झाली. त्यांनतर ती जगभरात पसरली आहे. गोव्याची सध्याची कचरा समस्या सोडवण्यासाठी ही संकल्पना फायदेशीर ठरेल असं द्रीष्टी आणि तिच्या टीमला वाटतं.

लोकांच्या प्रतिसादाचं विचारालं तर कचऱ्याच्या बदल्यात बियर कोण नको म्हणेल राव ? विनोदाचा भाग सोडला तर असेही ग्राहक आहेत ज्यांना स्वच्छतेचा हा अनोखा प्रयोग समाधान देऊन जात आहे. त्यांना आपण एका चांगल्या कामाला हातभार लावला याचं आनंद होत आहे.

तर मंडळी, तुम्ही कधी जाताय मग या वेस्ट बारच्या भेटीला. गेलात की एक सेल्फी जरूर पाठवा !!

सबस्क्राईब करा

* indicates required