f
computer

'व्हॅलेन्टाईन्स डे'साठी चक्क आकाशातून आलेली उल्का विकली जात आहे ?? एवढं काय खास आहे राव !!

‘व्हॅलेन्टाईन्स डे’ ला दरवर्षी नवनवीन गोष्टी चर्चेत असतात. गेल्यावर्षी भाडोत्री बॉयफ्रेंड म्हणून स्वतःला भाड्यावर देणारा मुलगा चर्चेत होता. यावर्षी एका वेगळ्या गोष्टीची चर्चा आहे.

मंडळी, ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या निमित्ताने चॉकलेट, ज्वेलरी, फुलं गिफ्ट करणं आता जुनं झालं. यावर्षी ‘व्हॅलेन्टाईन डे’साठी चक्क एक उल्का (meteorite) लिलावात ठेवण्यात आली आहे. ही उल्का हृदयाच्या आकारातली आहे. यामुळेच या उल्केचं नाव “हार्ट ऑफ स्पेस” ठेवण्यात आलंय. या आकारात सापडलेली ही आजवरची एकमेव उल्का म्हणता येईल.

पृथ्वीवर ही उल्का आली तरी कशी ?

मंडळी, दररोज आपल्या पृथ्वीच्या वातावरणात असंख्य उल्का प्रवेश करत असतात. या उल्का पृथ्वीत प्रवेश करून माणसांच्या डोक्यांवर पडण्यापूर्वीच पृथ्वी आपलं रक्षण करते. या उल्का पृथ्वीच्या कक्षेत पोहोचल्यानंतर नष्ट होतात. अशा उल्कांचा प्रचंड जमाव जेव्हा पृथ्वीवर येऊन आदळतो तेव्हा त्याला उल्का वर्षाव म्हणतात.

१९४७ साली इतिहासातला सर्वात मोठा उल्का वर्षाव झाला होता. या वर्षावात लोकांच्या घरांचं, वन्य जीवांचं आणि झाडाझुडपांचं प्रचंड नुकसान झालं होतं. या वर्षावातून हाती लागलेली मौल्यवान गोष्ट म्हणजे हे हृदयाच्या आकारातील उल्का पाषाण. मुख्य उल्का पाषाणाचे तुकडे झाल्यानंतर ही उल्का पृथ्वीवर विखुरली होती.

सायबेरियाच्या बर्फाळ भागात ही उल्का सापडली. तिचं परीक्षण केलं असता ती तब्बल ३० कोटी वर्ष जुनी असल्याचं सिद्ध झालं आहे. या खास उल्केला न्युयॉर्क येथे सांभाळून ठेवण्यात आलं होतं. येत्या ‘व्हॅलेन्टाईन्स डे’च्या निमित्ताने तिचा लिलाव होईल. या उल्केला तब्बल २ कोटीपेक्षा जास्त बोली लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मंडळी, प्रत्येकालाच काही उल्कापिंड विकत घेता येणार नाही, आपण फुलं आणि चॉकलेटवरच भागावूया. आता तुम्हीच सांगा तुम्ही ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ला तुमच्या ‘व्हॅलेन्टाईनला काय गिफ्ट देताय ते !!

सबस्क्राईब करा

* indicates required