f
computer

तुमच्या विसरभोळ्या मित्रांना हे ५ अॅप्स वापरायला लावा राव !!

मोबाईल फोन्समुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. जो डाटा आपण डोक्यात साठायचो तोच आता मोबाईल मध्ये साठवला जातो. याचा विपरीत परिणाम आपल्या स्मरणशक्तीवर आणि आकलनशक्तीवर पडणे स्वाभाविक आहे. साधं उदाहरण घ्या ना सोप्पी गणितं सोडवण्यासाठी पण आपल्याला मोबाईलचा कॅल्क्युलेटर वापरावा लागतो.

मग करायचं काय ? आज मोबाईल फोन्स मध्ये अनेक असे अॅप्स आहेत जे तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करतात. आज आम्ही अशाच ५ महत्वाच्या मोबाईल अॅप्सची माहिती सांगणार आहोत.

चला तर जाणून घेऊया !!

१. Elevate

Elevate अॅप मध्ये ३५ पेक्षा जास्त गेम्स भरलेले आहेत. हे गेम्स तुमचं व्यक्तिमत्व सुधारण्याचं काम करतात. तसेच स्मरणशक्ती, आत्मविश्वास, वाचन, लिखाण आणि ऐकण्याच्या क्षमतेला वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करतात. फक्त स्मरणशक्ती बद्दल बोलायचं झालं तर या अॅप मध्ये आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी प्रोग्रॅम्स दिलेले आहेत. गेम्सद्वारे मेंदूला व्यायाम दिला जातो. तुमच्या एकूण प्रगतीवर नजर ठेवली जाते आणि तुम्हाला प्रगती पुस्तकही दिलं जातं.

२. Lumosity

Lumosity हे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी एक प्रसिद्ध अॅप आहे. या अॅप मध्ये तुमची स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती वाढवण्यासाठी गेम्स दिलेले आहेत. या अॅपची निर्मिती मुळात आकलनशक्ती वाढवण्यासाठी करण्यात आली होती. हा अॅप एक प्रकारे तुमच्या मेंदूचा ‘जिम’ आहे असं म्हणण्यास हरकत नाही.

३. CogniFit

CogniFit अॅप हा आणखी एक ब्रेन ट्रेनिंग अॅप आहे. या अॅप मध्ये पण मेंदूला चालना देण्यासाठी गेम्स दिलेले असतात. तुमच्या कामगिरीवर नजर ठेवली जाते. तुमची स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला काय करणं आवश्यक आहे याचं मार्गदर्शन दिलं जातं. तुम्ही स्वतःसाठी गेम्स तयार करू शकता.

४. NeuroNation

NeuroNation अॅप आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अॅप आहे. या अॅप मध्ये तुम्हाला वैज्ञानिक संशोधनातून तयार करण्यात आलेले ब्रेन ट्रेनिंग प्रोग्राम्स मिळतात. NeuroNation तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासोबतच तुमची एकाग्रता आणि विचारशक्ती वाढवतं. या अॅप मध्ये ६० पेक्षा जास्त मेंदूचे व्यायाम फिट केलेले आहेत. अॅप तुमच्या कामगिरीचं विश्लेषणही देतं.  

५. Memorado

Memorado अॅप मध्ये तुम्हाला तुमचं उद्येश्य विचारलं जातं. समजा तुम्ही म्हणालात की मला जास्तीत जास्त नावं पाठ झाली पाहिजेत, तर त्या प्रमाणे गेम्स प्रोग्रॅम केले जातात. या गेम्सद्वारे तुम्हाला तुमचं उद्येश्य पूर्ण करता येतं. तुमची प्रगती तपासण्यासाठी तुम्हाला ‘मार्कही दिले जातात.

 

तर मंडळी, जिमला जा वा नका जाऊ पण या अॅप्सच्या माध्यमातून रोज मेंदूचा व्यायाम नक्की करा. आणि हो तुमच्या विसरभोळ्या मित्रांना tag करायला विसरू नका !!

 

आणखी वाचा :

आपण आपल्या मेंदूचा नक्की किती भाग वापरतो ? वाचून 'दिमाग का दही' नक्कीच होणार नाही पाहा !!

रोजच्या व्यस्त जीवनात मेंदू फ्रेश ठेवण्यासाठी करा ही सोप्पी ट्रिक !!

मेंदू ताजातवाना ठेवण्याच्या ७ अफलातून ट्रिक्स !!

या 3 प्रयोगातून तुम्ही तुमच्या स्वप्नांना कंट्रोल करू शकता राव !!

मेंदू तल्लख आणि तरतरीत ठेवण्याचे ७ उपाय !!

सबस्क्राईब करा

* indicates required