computer

बालदिनाचं गुगल डूडल कसं बनलं? वाचा या स्पर्धेबद्दल आणि ती जिंकणाऱ्या या मराठी मुलीबद्दल!!

मंडळी तुम्हाला गुगल डुडल माहीतच असेल. आपल्या अनोख्या डुडल्स मुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या गुगलने बालदिनानिमित्त एक स्पर्धा घेतली होती. स्पर्धा होती डुडल बनवण्याची… 
या स्पर्धेत संपूर्ण भारतभरातून स्पर्धकांनी भाग घेतला होता पण बाजी मारली ती आपल्या मराठमोळ्या मुलीने! पिंगला मोरे असं तिचं नाव !

75000 स्पर्धक या ‘डुडल 4 गुगल’ स्पर्धेत उतरले होते. स्पर्धेची थीम होती, ‘व्हॉट इंस्पायर्स मी?’ यात पिंगलाने काढलेले डुडल होते अवकाशाचे. तिला खगोलशास्त्रात रुची असल्याने तिने या विषयाची निवड डुडल साठी केली आणि स्पर्धा जिंकली. तिला पुरस्कार म्हणून पाच लाखाची शिष्यवृत्ती गुगलतर्फे मिळणार आहे. 

आपल्या या यशाबाबत पिंगला काय म्हणते बघू…

“मला ज्या गोष्टीपासून प्रेरणा मिळते मी त्याचेच डुडल बनवले. आपल्या विश्वात बरेच काही असे आहे जे आपल्यासमोर अद्याप आले नाही. ग्रह, तारे इत्यादी गोष्टींबाबत आणखी बरेच जाणून घ्यायचे आहे. या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात आपण किती छोटे आहोत आणि त्यापेक्षाही आपल्या समस्या किती छोट्या आहेत असा मनात विचार येतो. हीच कल्पना मनात ठेवून मी डुडल बनवले ज्यात आकाशात टेलिस्कोप घेऊन बघणारी मुलगी आहे आणि ती आकाशगंगा, ग्रह, अंतराळयान समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व गोष्टींमधून गुगल हे नाव दिसेल याची काळजी मी घेतली.” 

बालदिन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जातो. त्यांना लहान मुले आवडत असत म्हणून त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 14 नोव्हेंबर ला दरवर्षी बालदिन असतो. मुलांविषयी त्यांना प्रेम वाटत असे. आजची मुले ही देशाचे भविष्य असतात असे ते सांगत असत. त्यांचे बोलणे पिंगला सारखी मुले वेळोवेळी अगदी खरे करून दाखवतात. 

पिंगला राहुल मोरे ही मुंबईच्या जे. बी. वाच्छा हायस्कुलची विद्यार्थिनी आहे. अंतिम पाच स्पर्धकांमधून तिचा पहिला नंबर आला.  तिच्यासोबत ज्या डुडल्सना पारितोषिके मिळाली ती पुढीलप्रमाणे आहेत. 

1. पहिली ते दुसरी गटातील विजेता ठरला ठाणे येथील क्रिसेंट इंग्लिश हायस्कुलचा शेख मो. रफुल रिझवान. त्याच्या डुडलचे नाव आहे ‘वाईज मंकी’

2. तिसरी ते चौथी गटातील विजेती ठरली पुण्याच्या डॉल्फिन इंटरनॅशनल स्कूलची आरोही दीक्षित. तिच्या डुडलचे नाव आहे ‘फार्मर्स स्कुल’

3. पाचवी ते सहावी गटातील विजेती आहे दानिया कुलसुम. ती विशाखापट्टणम येथील श्री प्रकाश विद्यानिकेतनची विद्यार्थिनी आहे. तिच्या डुडलचे नाव ‘माय डेस्क, माय इन्स्पिरेशन’

4. नववी ते दहावी गटात ध्वनित नागर याने बाजी मारली. तो मुंबईच्या स्वामी विवेकानंद स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याच्या डुडलचे नाव ‘अनिमल्स इंस्पायर मी’ असे आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required