computer

लॉकडाऊनमध्ये सगळे वेबसिरीज बघून झाले? मग गुगलचं हे फिचर वापरा आणि नवीन मनोरंजन शोधा !!

लॉकडाऊनमध्ये सगळी पब्लिक बोर झाली आहे. टाईमपास तरी किती करणार नाही का? पण सध्या सगळ्यांचा कॉमन मनोरंजनाचा विषय आहे वेब सिरीज!!! सिरीज बनवण्याऱ्यांनी   लॉकडाऊन झाल्यावर धडाधड सिरीज रिलीज करून चांदी करून घेतली आहे. 

आतातर एवढ्या सिरीज आणि सिनेमे डिजिटल रिलीज झाले आहेत की लोकांना काय पाहू आणि काय नको असे झाले आहे. त्यात आधी आलेले गेम ऑफ थ्रोन्स, डीसी, मार्व्हलचे सिनेमे, त्याचप्रमाणे कित्येक प्रसिद्ध सिनेमे जे वेळ आहे म्हणून लोक पाहत आहेत.

या सगळ्यात मग एकेमेकांना सिरीज, सिनेमे सुचविणारे मात्र शहाणे ठरले आहेत. तर सातत्याने ' ए एखादी सिरीज सुचव ना'! असे विचारल्याने सांगणारे पण कंटाळले आहेत. तर आता यावर एक जालीम उतारा आला आहे. 

एका सर्चने तुम्हाला तुमचे उत्तर सापडणार आहे. तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष आहे? गुगल सर्चचा पर्याय आधी पण होताच की!!! पण तसे नाहीये आजपासून एक नविन फिचर आले आहे. त्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म जसे नेटफ्लिक्स, अमेजॉन प्राईम, वुट, सोनी लाईव्ह यांच्या वरील भन्नाट कंटेंट सहज शोधता येणार आहे. 

गुगल सर्च बॉक्सखाली what to watch चा एक ऑप्शन असेल तिथे जाऊन तुम्ही चांगले सिरीज, सिनेमे शोधू शकता. त्यात तुम्हाला भाषेचा सुद्धा पर्याय उपलब्ध असेल म्हणजे तुम्हाला ज्या भाषेतील कंटेंट हवा त्या भाषेतील कंटेंट उपलब्ध असेल. 

त्याच बरोबर गुगलने एक एडिट बटन दिले असेल तिथून तुम्ही कुठल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरचे शो पाहायचे आहेत याची निवड करू शकता. यु ट्यूबवर जसे वॉच लेटर नावाचा ऑप्शन असतो जिथे तुम्ही नंतर पाहण्यासाठी व्हिडिओ सेव करून ठेवता तसाच पर्याय इथे सुद्धा आहे. 

याच्यापेक्षा स्पेसिफिक सर्चसुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे 2020 साली आलेले सिनेमे, हॉरर सिरीज असे काही सर्च केल्यास तुम्हाला बरोबर त्याच जॉनरचे सिरीज किंवा सिनेमे तिथे दिसतील.

दुसऱ्यांना परत परत सिरीज सुचव विचारणे म्हणजे लोकांना कमीपणा वाटतो कारण आपल्याला कमी कळतं आणि सिरीज सुचवणारा लय मोठा शहाणा अशी एकंदरीत भावना त्यात येते. तर आता ती कटकटच बंद झाली आहे. कुणाला न विचारता थेट गुगलबाबाला विचारायचे तो सगळी उत्तरे देईल!!!!

सबस्क्राईब करा

* indicates required