computer

इलेक्ट्रिक कारचे अच्छे दिन....सरकारच्या या निर्णयाने आता इलेक्ट्रिक कारचा मार्ग मोकळा होणार !!

एकीकडे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि दुसरीकडे वाढते प्रदूषण, या दोन कारणांमुळे इलेक्ट्रिक कार्सचे खूप भविष्य चांगले आहे. त्यातल्या त्यात भारतात तर थोडे जास्तच. याच कारणाने इलेक्ट्रिक वाहनांना भारतात मोकळेपणाने फिरता यावे म्हणून सरकार एक भन्नाट योजना घेऊन आले आहे. सरकार देशातल्या सर्व पेट्रोल पंपांवर ई-वाहन चार्जिंग स्टेशन लावण्याच्या तयारीत आहे. मंडळी, या कामासाठी सरकारने नीती आयोग, अर्थ मंत्रालय आणि इतर संस्थांना कामाला पण लावले आहे. 

या योजनेनुसार सर्व पेट्रोल पंपांवर ई-चार्जिंग स्टेशन लावण्यात येईल. या स्टेशन्समुळे इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करने सोपे होणार आहे. याची सुरवात देशातल्या मोठ्या शहरांपासून करण्याचा प्रस्ताव आहे. मंडळी, हे स्टेशन्स लावण्याचा सरकारचा गेल्या पांच वर्षापासून विचार आहे. पण आजवर ते काय शक्य झाले नाही राव!! पण आता हे काम शक्य होईल असे दिसत आहे.

मंडळी, एनटीपीसी, पॉवरग्रीड अशा कंपन्यांनी हे स्टेशन्स लावायला सुरुवातही केली आहे. असे म्हणतात की पेट्रोल पम्प्सवर बॅटरी स्वाईप करण्याची पण सोय करण्यात येईल. याने असे होईल की तुम्ही तुमची डाऊन झालेली बॅटरी देऊन चार्ज असलेली बॅटरी घेऊन जाऊ शकता. यामुळे किती वेळ वाचेल ना राव!! 

असा एक अंदाज आहे की २०२३पर्यन्त देशभर इलेक्ट्रिक वाहने फिरायला लागतील. पेट्रोल आणि डिझेलवर होणारा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल.  त्याचबरोबर प्रदूषणाच्या समस्येवर मात करता येईल ते वेगळेच. फक्त कार्स नाहीत, तर इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये २ व्हीलर आणि ३ व्हीलर गाड्यासुध्दा मार्केटमध्ये यायला लागल्या आहेत. येणाऱ्या काही वर्षात पेट्रोल पंप्सची गरज पूर्णपणे संपेल असे दिसत आहे.

अर्थातच, या प्रस्तावाला काही कंपन्यांनी विरोध करायला सुरूवात केली आहे राव!! जगभरात इलेक्ट्रिक कार्सचे जोरदार स्वागत होत असताना काही कंपन्यांना स्वतःचा बिझनेस बुडण्याची भीती खात आहे. याचे महत्वाचे कारण असे आहे की याने नवीन उत्सर्जन मानके तयार होतील. त्याने या कंपन्यांना कमी प्रदूषणकारी गाड्या तयार करणे भाग पडेल म्हणून हा सगळा विरोध होत आहे. 

सरकार थेट गिगा स्केलवर बॅटरी निर्माण करण्याचा विचार करत आहे राव!! इतकेच नव्हे तर या सेक्टरमध्ये गुंतवणूक वाढावी यासाठी सरकार बऱ्याच टॅक्सेसमध्ये सूट देत आहे. यावरून तरी पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्या थोड्याच दिवसाचे पाहुण्या आहेत असे दिसत आहे राव!!

तर मंडळी, गाडी घेणार असाल तर इलेक्ट्रिक गाड्यांचा पण थोडा विचार करुन पाहा..

सबस्क्राईब करा

* indicates required