हॉर्न वाजवला तर भरावा लागणार दंड...मुंबई ट्राफिक पोलिसांचा भन्नाट प्रयोग तर बघायलाच हवा !!

परवाच बंगलोर शहराचा ट्राफिकच्या बाबतीत जगात पहिला नंबर लागलेला आहे. मुंबईचं अजून तसं काही झालेलं नाही. बंगलोर इतकी नसली तरी मुंबईत पण ट्राफिकची समस्या आहे. मेट्रो आणि रस्त्यांच्या कामांमुळे ही समस्या वाढतच असते. ट्राफिकमध्ये अडकणे हा तर त्रास असतोच पण तो वाढवण्याचं काम हॉर्नचा आवाज करत असतो. काही लोकांना वाटतं की सतत हॉर्न वाजवल्याने ट्राफिक पुढे सरकेल. पण तसं न होता डोकेदुखी मात्र वाढते.
तर, मुंबईच्या ट्राफिक पोलिसांनी या समस्येवर आता एक जालीम आणि रामबाण उपाय शोधून काढला आहे. ट्राफिक पोलिसांनी केलेला हा भन्नाट प्रयोग पाहा.
मुंबईच्या ट्राफिक पोलिसांनी सिग्नलमध्ये दोन बदल केले. एकतर सिग्नल जवळ ध्वनी मोजण्यासाठी डेसिबल मीटर आणि सोबत मायक्रोफोन बसवला. दुसरी गोष्ट म्हणजे सिग्नल कितीवेळ असेल हे समजण्यासाठी तिथे टायमर पण बसवला.
मायक्रोफोन आणि डेसिबल मीटरमुळे गोंगाट मोजला गेला. परिणामी एका ठराविक पातळीपेक्षा जास्त गेल्यावर सिग्नलची वेळ ९० सेकंदांनी वाढली. जेवढ्या वेळा आवाज वाढेल तेवढ्या वेळा ९० सेकंदांनी वेळ वाढेल अशी ही व्यवस्था होती. लोकांना हा प्रकार बुचकळ्यात पाडणारा होता, पण लवकरच त्यांना सगळा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी हॉर्न वाजवणं बंद केलं.
या प्रयोगावर मुंबई पोलिसांकडून एक व्हिडीओ ट्विट केला आहे. लगेच पाहून घ्या.
>Horn not okay, please!
— Mumbai Police (@MumbaiPolice) January 31, 2020
Find out how the @MumbaiPolice hit the mute button on #Mumbai’s reckless honkers. #HonkResponsibly pic.twitter.com/BAGL4iXiPH
तुम्हाला आवडली का ही आयडिया? आता तरी ट्राफिकमधला गोंगाट कमी होईल का?