तिची त्वचा सापासारखी बदलते : वाचा जिवंतपणी मरणयातना भोगणाऱ्या शालिनीची कहाणी...

ज्या वयात नवनवीन स्वप्नं पहावीत, मजा-मस्ती करावी, हसावं-खिदळावं, ज्ञानाचे धडे घेऊन उज्वल भविष्याचा पाया रचावा... त्या वयात तिला भोगावी लागतीय अशी नरकयातना जी कदाचित कोणाच्याही वाटेला आली नसावी. हा किस्सा आहे शालिनी यादव नावाच्या १६ वर्षाच्या मुलीचा. या मुलीला जडलेल्या भयानक आजारामुळे तिला एखाद्या सापासारखं जीवन व्यतीत करावं लागतंय.

स्त्रोत 

शालिनीला लहानपणापासून Erythroderma नावाचा भयानक आजार आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की तिची त्वचा सापासारखी आहे. साप जसा कात टाकतो, अगदी त्याच प्रकारे दर ४५ दिवसांनी शालिनीची त्वचा बदलते. अशा वेळी  शालिनीला जो त्रास होतो तो तुम्हांआम्हांला समजण्यापलीकडचा आहे.

या आजारावर डॉक्टरांकडे कोणताही इलाज नाही. 'बाकीची मुलं घाबरतात', हे कारण सांगून शाळेतूनही शालिनीला बाहेर काढलं गेलंय. आपल्या त्वचेतील ओलावा टिकून राहावा यासाठी तिला रात्रंदिवस प्रत्येक तासाला आपलं शरीर पाण्यानं भिजवावं लागतं. सोबत प्रत्येक ३ तासाला त्वचेवर मॉईश्चरायझर क्रीम लावावी लागते. पण घरची परिस्थिती इतकी वाईट आहे की ते तिला ही क्रीमही घेऊन देऊ शकत नाहीत. तिची आई आणि बाबा त्यांना मिळणाऱ्या  तुटपुंज्या पगारावर आठ जणांचं कुटुंब चालवतात. त्यांना या सर्व गोष्टींचा खर्चही परवडत नाहीय.

स्त्रोत

आपल्या मुलीचा त्रास बघून तिचा परिवारही आता तिच्या मरणासाठी प्रार्थना करतोय!! शालिनीच्या इतर दोन भावंडांना मात्र असा काही रोग नाही. क्षणाक्षणाला मरणयातना सोसणारी शालिनी म्हणते,

मला पाहून लहान मुलं घाबरतात, पण यात माझा दोष नाही. मला जगायचं आहे, शिकायचं आहे. मदत करू शकणार्‍यांनी कृपया मला मदत करा.

सबस्क्राईब करा

* indicates required