computer

शत्रूच्या मनात धडकी भरवणारे 'अपाचे गार्डियन' विमान आता भारतीय सेनेत...वाचा ५ महत्वाचे मुद्दे !!

मंडळी, भारतीय वायू सेनेचा आकाशातील दबदबा आता आणखी वाढणार आहे, कारण नुकतंच वायू सेनेत अपाचे गार्डियन या अत्याधुनिक हेलिकॉप्टरचा समावेश झाला आहे. सध्या भारतीय सेनेकडे असलेली रशियन मिग-३५ विमाने निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत. अगदी त्याचवेळी भारताने अपाचे गार्डियन आणून एक पाऊल पुढे टाकलं आहे.

चला तर ‘अपाचे गार्डियन’चं महत्व जाणून घेउया !!

१. अपाचे गार्डियन जगातल्या सर्वोत्तम लढाऊ विमानांपैकी एक विमान आहे. कमी उंचीवरून मारा करण्यासाठी त्याला खास डिझाइन करण्यात आलंय. या विमानात नाईट व्हिजन सिस्टम अत्याधुनिक आहे.

२. अपाचे गार्डियनची गती ही तब्बल ताशी २८० किलोमीटर एवढी आहे. याखेरीज या विमानाला रडारवर पकडणे अवघड आहे.

३. जमिनीवरील रणगाडे उध्वस्त करण्यासाठी अपाचे गार्डियन मध्ये तब्बल १६ मिसाईल सोडण्याची क्षमता आहे.

४. भारतीय वायू सेनेला मिळालेलं अपाचे गार्डियन विमान हे खास भारतीय लष्करासाठी डिझाईन करण्यात आलंय. भारतातल्या दुर्गम भागात, कोणत्याही ऋतूत हे विमान जाऊ शकेल.

५. अपाचे गार्डियनला घातक बनवणारी गोष्ट ही त्याच्या डाटा नेटवर्कींग मध्ये आहे. विमानाच्या डाटा नेटवर्क मधून शस्त्रास्त्रांची माहिती समजून घेण्याची क्षमता आहे. तसेच युद्धभूमीवरील छायाचित्र मिळवण्याची आणि ती प्रसारित करण्याची क्षमता देखील आहे.

मंडळी, अपाचे गार्डियन विमाने अमेरिकन आहेत. या विमानांचा वापर अमेरिकेने महत्वाच्या कारवायांमध्ये केला होता. भारताने अमेरिकेशी २२ विमानांचा करार केला आहे. त्याप्रमाणे पाहिलं विमान काल भारताच्या ताफ्यात आलं. जुलै २०१९ पर्यंत उरलेली विमाने भारताला मिळणार आहेत. भारतीय वायू सेनेने यापूर्वी अपाचे सारखी विमाने हाताळलेली नाहीत त्यामुळे अमेरिकेने मोजक्या अधिकाऱ्यांना तशी ट्रेनिंग दिली आहे. अपाचे विमानांची जबाबदारी आता या अधिकाऱ्यांवर असणार आहे.