नवरीशिवाय याचं धुमधडाक्यात लग्न झालं !! काय आहे कारण ??

मंडळी, लग्न म्हटलं की कमीतकमी मुलगा आणि मुलगी तरी असायलाच पाहिजे नाही का ? नाही तर ते लग्न कसलं. पण गुजरातच्या एका लग्नात नवरदेव तर होता पण नवरी नव्हती. या मागचं कारण वाचून तुम्हाला या नवरदेवाइतकंच वाईट वाटेल.

स्रोत

गुजरातच्या हिम्मतनगर भागात अजय बारोट या व्यक्तीचं लग्न होतं. अजय हा learning disability म्हणजे “अध्ययन अक्षमता” या आजाराने ग्रस्त आहे. हा आजार मुलांना जन्मतःच असतो. या आजाराने ग्रस्त असलेली मुलं ही हुशार आणि तल्लख असतात, पण त्यांना लिहिण्या, वाचण्यात, विचार करण्यात अडचण येते.

हे वाचून तुम्हाला समजलं असेलच की अजयच्या लग्नात नवरी का नव्हती. असं असलं तरी त्याच्या वडिलांनी त्याचं धुमधडाक्यात लग्न लावून दिलं. याचं कारण असं, की अजयची अशी इच्छा होती की इतरांप्रमाणे त्याचं पण धुमधडाक्यात लग्न व्हावं. अजयच्या भावाचं लग्न पार पडलं तेव्हा पण त्याने ही इच्छा बोलून दाखवली होती, पण त्याच्यासाठी मुलगी शोधणं अवघड होतं. मग त्याच्या वडिलांनी नवरीशिवाय त्याच्या लग्नाचं आयोजन केलं जेणेकरून अजयचं समाधान होईल.

स्रोत

मंडळी, लग्नासाठी ८०० लोकांसाठी खाना आयोजित करण्यात आला होता. आलेल्या पाहुण्यांनी पण या लग्नात उत्साहाने भाग घेतला.

learning disability आजार असलेल्या मुलांना त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी समजून घेण्याची गरज असते. याबद्दल अजयच्या कुटुंबाचं कौतुकच केलं पाहिजे.

 

सबस्क्राईब करा

* indicates required