भारतीय नौदलाची फनी वादळाशी झुंज.....हे पाहा फोटो !!

हा लेख लिहित असताना फनी वादळाने ओडीसाच्या किनारपट्टीला धडक दिल्याची बातमी आली होती. ओडीसा सोबत भारताच्या पूर्व किनाऱ्यावर असणाऱ्या आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल या प्रदेशांना तसेच म्यानमार, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका या देशांमध्ये पण फनी थैमान घालणार आहे.
१९९९ च्या वादळानंतरचं सर्वात भयानक वादळ म्हणून फनी वादळाकडे बघितलं जात आहे. आपल्याला घरात बसल्या या वादळाची कल्पना येणार नाही, पण भारतीय नौदलाने ट्विट केलेले फोटो बघून तुम्हाला तिथल्या वातावरणाची कल्पना येऊ शकते. हे पाहा ते फोटो.
सर्व फोटो (स्रोत)
फनी वादळ पोहोचण्यापूर्वीच भारतीय नैदालाने मदत कार्याला सुरुवात केली होती. फोटो मध्ये मदत कार्यासाठी निघालेल्या एका जहाजाचा फोटो आहे. वादळामुळे जहाजाच्या डेकचा भाग एका बाजूला जवळजवळ ४५ डिग्रीपर्यंत झुकलेला आहे. दुसऱ्या एका फोटो मध्ये जहाजाच्या आतील भाग दिसत आहे. हा भाग पाण्याने भरला आहे. वादळामुळे जहाजांची ही स्थिती तर मग किनारपट्टीवर वादळ काय थैमान घालेल याचा फक्त विचारच केलेला बारा.
भारतीय नौदलाने फनी वादळ कशाप्रकारे भारताच्या दिशेने वळत आहे याचाही व्हिडीओ शेअर केलेला होता. हा पाहा तो व्हिडीओ.
Have a look at the system. Video courtesy https://t.co/oRhiwPLN3U pic.twitter.com/zAhvolrEF2
— SpokespersonNavy (@indiannavy) May 2, 2019
मंडळी, या वादळाला फनी हे नाव बांगलादेशने दिलं आहे. फनीचा अर्थ होतो साप. नावाप्रमाणेच हा साप डंख मारायला निघालेला आहे. आपण प्रार्थना करूया की आपले नागरिक आणि नौदल सुखरूप राहो.