computer

भारतीय फोटोग्राफरने आयफोन फोटोग्राफी स्पर्धेत मारली बाजी...हा अफलातून फोटो पाहून घ्या !!

आयफोनवर घेतलेल्या फोटोंसाठी २००७ पासून ‘आयफोन फोटोग्राफी ॲवॉर्ड’ स्पर्धा भरवली जाते. यावर्षी या स्पर्धेचा विजेता एक भारतीय ठरलेला आहे. त्याच्या फोटोला २०१९ चा सर्वोत्कृष्ट फोटोचा पुरस्कार आणि ‘गोल्ड बार’ने गौरवण्यात आलंय. त्याने घेतलेला हा फोटो पाहा.

या फोटोग्राफरचं नाव आहे श्रीकुमार कृष्णन. ते बंगलोरचे आहेत. स्पर्धेतील ‘Sunset’ विभागात त्यांच्या फोटोने बाजी मारली आहे. या फोटोत रामाची मूर्ती दिसत आहे आणि मागे मावळणाऱ्या सूर्याच्या किरणांनी उजळलेलं निळ्या-केशरी रंगातील आकाश दिसत आहे. हे ठिकाण बंगलोरमधलं आहे.

हा पुरस्कार जाहीर केल्यानंतर ‘आयफोन फोटोग्राफी ॲवॉर्ड’’तर्फे श्रीकुमार यांच्या फोटोचं कौतुक करताना सांगण्यात आलंय की “संध्याकाळच्या आभाळावर पसरलेल्या ढगांनी समोरच्या दृश्याला अगदी साजेसं असं वातावरण तयार केलं आहे.”

स्पर्धेचे विजेते ठरवताना कलात्मक योग्यता, खरेपणा, विषय आणि शैली या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करण्यात आला. या मापदंडावर खरे उतरणाऱ्या फोटोला पुरस्कार देण्यात आला आहे.

श्रीकुमार कृष्णन यांच्याबद्दल थोडक्यात :

कृष्णन हे व्यावसायिक फोटोग्राफर आहेत. त्यांनी आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. बंगलोरमध्ये ते फोटोग्राफी शिकवतात. ‘Indian Sunshine’ हा त्यांचा फोटोग्राफ फ्रान्सच्या ‘लुव्र ’ येथे प्रदर्शनात ठेवण्यात आला होता. तसेच कृष्णन यांचे फोटो नॅशनल जिओग्राफिकच्या वेबसाईटवर झळकले होते.
तुम्हाला कसा वाटला हा फोटो? तुमची प्रतिक्रिया नक्की द्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required