एका नंबर प्लेटसाठी त्याने मोजले तब्बल १६ लाख ? बघा बरं कोणता नंबर आहे हा !!

गाडीचा नंबर प्लेट कसा असावा याचा सुद्धा चॉईस असतो राव. अनेकांना ‘राजे’, ‘मराठा’, ‘राम’, ‘भाऊ’ अशा पद्धतीच्या नंबर प्लेट्सची क्रेज असते. मंडळी, नंबर प्लेटच्या अशाच वेडापायी जयपूरच्या एका कोट्याधीशाना एका खास नंबर प्लेटसाठी तब्बल १६ लाख रुपये मोजले आहेत.

काय राव, या रकमेत तर नवीन गाडी आली असती. असो...

या माणसाचं नाव आहे राहुल तनेजा. त्याला ‘१’ नंबर चा शौक आहे राव. त्यामुळे त्याला कारचा नंबर देखील ०००१ असा हवा होता. या हट्टापाई त्याने हवा तेवढा पैसा देण्याचं कबूल केलं. शेवटी हा आकडा तब्बल १६ लाख पर्यंत गेला. आता तो RJ 45 CG 0001 नंबर प्लेट असलेल्या कारचा मालक आहे.

स्रोत

राव, राहुलच्या मोबाईल नंबर मध्ये देखील पाच १ आहेत. त्याने स्कोडा लौरा कार विकत घेतली होती त्याचं कारण म्हणजे त्या गाडीचा नंबर RJ 20 CB 0001 होता. २०११ साली त्याने RJ 14 CP 0001 नंबरसाठी १० लाख रुपये मोजले होते. हे तर काहीच नाही राव, १९९६ साली त्याने जेव्हा पहिली स्कूटर विकत घेतली तेव्हा त्याचा नंबर प्लेट RJ 14 23M 2323 होता. आता तुम्ही म्हणाल यात १ नंबर कुठे आहे. त्याचं असं आहे, २+३+२+३ = १० होतात राव. म्हणजे यातही त्याने १ शोधून काढला.

राहुल आज कोट्याधीश असला तरी तो एकेकाळी अगदी गरीब होता. त्याचे वडील टायर रीपेयारिंगचं काम करायचे. त्याने स्वतः अनेक लहानसहान कामे करून पोट भरलं होतं. आज तो एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा मालक आहे. तो म्हणतो की ‘माझं आयुष्य संघर्षपूर्ण राहिलं आहे, त्यामुळे आज जेव्हा माझ्याकडे पैसा आहे तर मला त्या पैशांची मजा लुटायची आहे.’

राव शेवटी काय तर, ‘शौक बडी चीज है !!’

 

आणखी वाचा :

सलमानला कोर्टात खेचणाऱ्या बिश्नोई समाजाबद्दल या ७ गोष्टी माहित आहेत का ?

सबस्क्राईब करा

* indicates required