computer

बायजुमध्ये कोणकोणत्या पदासाठी भरती सुरु आहे आणि अर्ज कसा करायचा ? जाणून घ्या !!

भारतातील ऑनलाईन शिक्षणातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म म्हणून बायजु या कंपनीची ओळख आहे. लॉकडाऊनमध्ये तर त्यांचा आलेख अजूनच वाढला. मुलं घरी बसून राहण्यापेक्षा बायजुवर नोंदणी करून नवीन गोष्टी शिकली.  लॉकडाऊनमध्ये तब्बल २० लाख नविन विद्यर्थ्यांनी बायजुवर नोंदणी केली आहे. साहजिक कंपनीला आता अधिक लोकांची गरज पडणार आहे.

दिवसेंदिवस बायजुचा व्याप वाढत असल्याने अनेका मोठ्या गुंतवणूक संस्थांनी बायजुत गुंतवणूक केली आहे. एकूणच बायजु आता फोफावत आहे आणि त्यांना माणसांची  गरज आहे. आजच्या लेखात आपण बायजुत कुठल्या कुठल्या कामांसाठी नोकरीच्या संधी आहेत ते बघणार आहोत.

1) कंटेंट रायटर(लेखक)

तुमचा अभ्यास चांगला खोल असेल आणि ते तुम्ही शब्दांत नीटपणे व्यवस्थित व्यक्त करू शकत असाल तर इथे तुम्हाला चांगली संधी आहे. कंपनीकडून अभ्यासाचे व्हिडीओ आणि पुस्तके तयार केली जातात. त्यासाठी स्क्रिप्ट लिहिण्याचे काम करावे लागणार आहे. या कामासाठी तुमचा कॉमर्स, गणित, इंग्लिश, विज्ञान अशा विषयांचा चांगला अभ्यास असणे गरजेचे आहे. यासाठी एखाद्या व्यक्तीस आधीचा अनुभव नसला तरी अर्ज करता येणार आहे.

2) सिनियर मॅनेजर - मार्केटिंग

या कामासाठी तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कंपनीसाठी चांगल्या डिजिटल मार्केटिंगचं नियोजन करण्याचं काम तुमच्याकडे  असणार आहे. तुमची निवड होण्यासाठी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग संबंधी विविध गोष्टींची माहिती असायला हवी.

3) ॲनिमेटर

ॲनिमेशन हे ऑनलाईन शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे ॲनिमेटर्सची गरज तर बायजुसारख्या कंपनीला भासेलच. 2D/3D इमेजेस संबंधी काम करणे, हाय क्वालिटी फोटोरिअलिस्टिक इमेज तयार करणे या प्रकारचे काम तुम्हाला करावे लागणार आहे. डिजाईन, ॲनिमेशनमध्ये अधिकृत शिक्षण झाले असेल तर इथे तुम्हाला चांगली संधी आहे.

4) एच.आर. मॅनेजर 

बायजु अशा एचआर मॅनेजरच्या शोधात आहे जो थेट कंपनीमधील व्हाईस प्रेसिडेंटला रिपोर्ट करेल. तसेच एच.आर.चे मुख्य काम म्हणजे मॅनेजमेंट आणि कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय राखणे ही त्या व्यक्तीला करावे लागणार आहे. 

तर, या प्रकारच्या नोकऱ्या सध्या बायजुमध्ये उपलब्ध आहेत. यासाठी तुम्ही बायजुच्या वेबसाईटवर जाऊन अप्लाय नावाचे सेक्शन आहे तिथे क्लिक करायचे आहे. पुढे कुठल्या पदासाठी कसा फॉर्म भरायचा सगळी माहिती तिथे उपलब्ध आहे. तुमच्या आजूबाजूला नोकरी गेलेले किंवा नुकतेच शिक्षण पूर्ण करून नोकरी शोधत असणारे खूप लोक असतील. हा लेख शेअर करून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवू शकता. 
उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required