व्हिडीओ ऑफ दि डे : टपरीवाल्या दादाचं भन्नाट बारटेंडिंग... व्हिडीओ पाहून घ्या...

या जगात कोणाकडे कसलं टॅलेंट सापडेल हे सांगण जरी कठीण असलं तरी ते जगासमोर आणून त्या व्यक्तीला बेफाम प्रसिध्दी मिळवून देण्याचं काम मात्र आज इंटरनेट चोख बजावत आहे.
Bartending Skills on street side stall pic.twitter.com/daHCnnG5yn
— Rosy (@rose_k01) April 13, 2019
आता केरळमधला एक टपरीवाला असाच लोकप्रिय होतोय ते त्याच्या बारटेंडिंगच्या कौशल्यामुळे. खरंतर बारटेंडिंग हे एखादा प्रशिक्षीत आणि अनुभवी बारटेंडरच करू शकतो. पण इथे हा माणूस कॉल्डकॉफी बनवताना अतिशय सराईत आणि सफाईदारपणे बारटेंडींग करतोय. त्याचा हा व्हिडिओ कोणीतरी ट्विट केला. आणि अनेकांनी या माणसाच्या कलेचं भरभरून कौतूकही केलं..