computer

साडीचा सेल बंद करण्यासाठी चक्क पोलिसांना बोलावण्यात आलं ? नेमकं काय घडलं तिथे ??

प्रत्येक शहरात कुठल्या ना कुठल्या दुकानात सेल लागलेला असतोच. बऱ्याच लोकांचा असा समज असतो कि जो माल विकला जात नाही, तो माल दुकानदार सेल लावून खपवण्याचा प्रयत्न करतो.  तो माल विकत घेण्यालायक नसतोच असा समज करून घेतल्याने बरेच लोकं सेल लागलेला असताना खरेदी करत नाही. मंडळी, मुळात पुरुष हा प्राणी खरेदीसाठी बनलाच नसावा असे वाटावे इतके खरेदीच्या बाबतीत पुरुष निरुत्साही असतात. याच्या उलट स्त्रिया मात्र किती खरेदी करू आणि किती नाही अश्या स्वभावाच्या असल्याचे दिसून येते. त्यात जर स्वस्तात काही मिळत असेल तर क्या केहना, उचलली बॅग आणि चालले खरेदीला असा प्रकार अनेक घरात पाहायला मिळतो.

मंडळी, तुम्ही अनेक ठिकाणी खरेदीसाठी रांगा लागलेल्या पाहिल्या असतील, काही दुकाने त्यांच्या मालाच्या क्वालीटीसाठी एवढे प्रसिद्ध असतात की तिथे खरेदीसाठी लोक रांगा लावतात.  अनेकांना माल संपला किंवा दुकान बंद झालं म्हणुन निराश पण व्हावे लागते !!

पण मंडळी, तुम्ही कधी असं ऐकलंय का, सेल लागलेला आहे आणि तिथे एवढी गर्दी गोळा झाली की थेट पोलिसांना तो सेल बंद करावा लागला, नाही विश्वास बसत ना पण हे खरे आहे राव!! उल्हासनगरमध्ये लागलेला सेल पोलिसांना बंद करावा लागला आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमके काय घडले ते.

अश्विन साखरे यांचे उल्हासनगर येथील गजानन मार्केटमध्ये दुकान आहे. वर्षभर आपण व्यवसाय करून खूप फायदा कमवतो. त्यातून लोकांसाठी काहीतरी करावे म्हणून या भाऊंनी थेट 10 रुपये ते 90 रुपये एवढ़या किमतीत साड्या मिळतील असा सेल लावला. 5 जूनला सूरु झालेला सेल प्रचंड चालायला लागला. अगदी 10 रूपयात साड़ी मिळत आहे म्हटल्यावर पब्लिक किती पेटली असेल याचा विचार करा राव!!

सेल लागल्यानंतर तिथे इतकी प्रचंड गर्दी वाढत गेली, की दुकानातील स्टाफला गर्दी सांभाळणे कठीण जाऊ लागले. दूकान मालकांनी सगळ्यांना रांगेत उभे राहण्याची विनंती केली. पण मंडळी एक विशिष्ट लेव्हल पर्यंत गर्दी असली की तिला आपण रांगेत उभे करून कंट्रोल करू शकतो, पण इथे तोबा गर्दी उसळली होती. शेवटी तिथे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. कारण साड्या घेण्यावरुन ग्राहकांमध्ये भांडण व्हायला लागली होती. अनेक वयस्कर नागरिक सुद्धा दुकानात ठाण मांडून बसले होते. अश्या परिस्थितीत शेवटी पोलिसांनी सेल बंद करायला लावून नेहमीच्या किमतीत साड्या विकण्याची विनंती दुकान मालकांना केली.

पण गोष्ट अजुन संपलेली नाही ना राव!! लोकं पोलिस येऊन सुद्धा ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती. अनेकजण दिवसभर साडी घेण्यासाठी थांबले होते. असा अचानक सेल बंद करायला त्यांनी विरोध सूरु केला. सोबत खरेदी करायला आलेल्या स्त्रियांपैकी एकिला साडी मिळाली आणि दूसरीला मिळाली नसल्याने 'मला मिळत नाही तोवर मी हलणार नाही' असा पवित्रा काही स्त्रियांनी घेतला. शेवटी परिस्थिती हाताबाहेर जायला लागल्यावर पोलिसांनी थेट दुकानच बंद केले. दिवसभर दुकान बंद ठेऊन दुसऱ्या दिवशी सुरळीत दुकान सूरु झाले.

तर असे आहे मंडळी,  कुठे काय घडेल आणि कुठल्या गोष्टीसाठी पोलिस बोलवावे लागतील काहीच सांगता येत नाही.


आमचा हा लेख तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेयर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required