या लहान मुलाने झोमॅटोकडून मागवली खेळणी....झोमॅटोने काय केलं पाहा !!

मोठे सेलेब्रिटी कसे लहान मुलांच्या इच्छा पूर्ण करतात हे तुम्ही पाहिलेच असेल, पण हेच कधी एखाद्या कंपनीने केले असे तुम्हाला दिसणार नाही. कारण त्यांना फक्त त्यांच्या कामाशी मतलब असतो. पण झोमॅटोच्या एका कृतीमुळे झोमॅटोची सगळीकडे वाह वाह होत आहे!!! काय होती ती घटना, चला पाहूया...

मुंबईतील इर्शाद दफ्तरी यांनी ट्विटरवर एक फोटो टाकला. त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले होते की, 'माझ्या मुलाला वाटते की जर त्याने झोमॅटोला त्याच्या आवडत्या खेळण्यांची लिस्ट पाठवली तर झोमॅटो ती त्याला डिलिव्हर करेल'.  त्यांच्या मुलाने फुगे, खेळणी आणि गिफ्ट्स मागवल्याचे मेसेजेस पण त्यांनी त्या ट्विटमध्ये टाकले होते.

ट्विटर युझर्सना त्या लहानबाळाचा निरागसपणा खूप आवडला आणि त्यांनी त्या बाळाच्या ट्विटवर झोमॅटोला टॅग केले. जेव्हा झोमॅटोने हे बघितलं तेव्हा त्यांनी दुर्लक्ष न करता सगळ्यांना सरप्राईज दिलं.

इर्शादने परत एक ट्वीट करुन सांगितले की, झोमॅटोने त्यांच्या मुलाला एक कार गिफ्ट केली आहे. त्यांनी ट्वीट केलेल्या फोटोत त्यांचा मुलगा त्या कारसोबत खेळताना दिसत होता.

मंडळी, जेवण ऑर्डर केल्यावर घरपोच जेवण देणारी कंपनी त्या लहान बाळाला सांताक्लॉज वाटली. इथे काहीही ऑर्डर केले की आपल्याला घरपोच मिळेल असे त्याला वाटले. झोमॅटोने पण त्याला निराश न करता त्याला कार गिफ्ट केली. या कृतीमुळे झोमॅटो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

लेखक : वैभव पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required