computer

बिबट्या चक्क प्लास्टिक खातोय ? या व्हायरल फोटोमागची गोष्ट माहित आहे का ?

प्लास्टिक पर्यावरणासाठी किती धोकादायक आहे हे सगळ्यांना माहीत आहे. प्लास्टिकमुळे दिवसेंदिवस परिस्थिती कशी वाईट होत आहे, हे पण बातमीचा विषय राहिला नाही. पण मंडळी परिस्थिती आता खरोखर हाताबाहेर जायला लागली आहे. प्लास्टिक फक्त समुद्र, नद्या यांनाच खराब करत नाहीये तर प्राणीजीवन सुद्धा त्यापासून सुटलेले नाही. आता प्राण्यांना सुद्धा या प्लास्टिक प्रदूषणामुळे विविध कारणांनी फटका बसायला लागला आहे राव!! 

काही दिवसांपूर्वी एक बिबट्या प्लास्टिक खात असल्याचा फोटो वायरल झाला आणि प्लास्टिक कसे प्राणिजीवन उध्वस्त करत आहे यावर चर्चा झडायला लागल्या. मंडळी, असे काही झाले की मिडिया काय लोकं सुध्दा दोन दिवस चर्चा करून घेतात आणि सगळं विसरून जातात राव!! मग समस्या परत जैसे थे राहते. त्या बिबट्याचा फोटो हा कार्बेट व्याघ्र संग्रहालयातील असल्याचे बोलले जात आहे. हा फोटो उत्तराखंड येथील वन संरक्षक असलेले पराग मधुकर धकाटे यांनी सोशल मीडियावर शेयर केला आहे. 

धकाटे यांनी सांगितले की 'हा गंभीर मुद्दा आहे आणि सगळ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. आजवर अशी कुठलीही घटना घडल्याचे आठवत नाही. पण आता या विषयाची आम्ही गंभीर चौकशी करणार आहोत'.
खरंच आहे राव!! बिबट्या माणसांना खायला लागलाय हे तर तुम्ही आम्ही नेहमी ऐकतो पण आता तर प्लस्टिक सुद्धा खातोय म्हणजे विषय गंभीर असला पाहिजे नाही का? 

कार्बेट व्याघ्रप्रकल्पाचे डायरेक्टर असलेले राहुल यांनी सांगितले की, हा खूप गंभीर प्रकार आहे, जर कदाचित तो फोटो कार्बेट प्रकल्पातील नसेल तरी संरक्षित परिसरात सुद्धा असे प्रकार होऊ शकतात याचा तो फोटो पुरावा आहे. आणि हे धक्कादायक आहे. याच्यापुढे अशा गोष्टी घडू नये म्हणुन आम्ही काळजी घेऊ असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. 

पराग धकाटे यांनी असाच अजुन एक फ़ोटो हत्तीचा टाकला आहे. त्यात तो हत्ती पूर्णपणे प्लास्टिकने व्यापलेल्या परिसरात फिरतो आहे. यातून फक्त प्राण्यांसाठी संरक्षित केलेल्या परिसरात सुद्धा अशी परिस्थिति असेल तर बाकी ठिकानांबद्दल तर बोलण्याची गरजच नाही राव!! 

मंडळी, असे प्रसंग पहिल्यांदा घड़लेले नाहीत अधुन मधुन असे प्रसंग घडत असतात. या वर्षीच्या सुरुवातीला सुद्धा चेन्नई येथील गुंडी नॅशनल पार्कमध्ये 9 हरणांचा प्लास्टिक खाल्ल्यामुळे मृत्यु झाल्याची बातमी होती. एवढेज नाहीतर एका हरणाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तर त्याच्या पोटात तब्बल 6 किलो प्लास्टिक असल्याचे समजले होते.

सबस्क्राईब करा

* indicates required