computer

पब्जीचा नवीन ट्रेलर सांगतोय पब्जीच्या जन्माची कथा....ट्रेलर पाह्यला नसेल तर लगोलग पाहून घ्या !!

मंडळी, नेहमी असं होतं की एखादा अॅक्शन पॅक सिनेमा येतो आणि मग काही दिवसांनी त्याच्यावर आधारित गेम काढला जातो. पब्जीची बातच निराळी आहे राव. पब्जीच्या मालकांनी पब्जी प्रसिद्ध होऊन वर्ष दीड वर्षांनी आपल्या गेमची 'ओरिजिन स्टोरी' तयार केली आहे. नुकताच आलेला पब्जीच्या चौथ्या सिझनचा ट्रेलर चक्क 'एरेन्गल' बेटाचा इतिहास सांगतोय.

हा पाहा ट्रेलर.

मंडळी, या सिनेमॅटिक ट्रेलरमध्ये एक अज्ञात मुलगा दिसत आहे. तो १९६५ च्या काळातल्या एरेन्गलची गोष्ट सांगतोय. तेव्हा कोणत्यातरी अज्ञात शक्तीने एरेन्गलचा सर्वनाश केला होता. हा मुलगा त्यातून वाचलेला एकमेव माणूस आहे. तो म्हणतो की ‘या बेटाने मला जिवंत राहायचं शिकवलं.’ आता स्टोरी येते फॉरवर्ड होऊन आजच्या काळात. हा मुलगा आता मोठा झाला आहे आणि एरेन्गलचं रुपांतर त्याने युद्धभूमीत (battlegrounds) केलंय. का ? तर, इतरांना जगण्याचा शोध घेता यावा म्हणून.

मंडळी, याचा अर्थ तुम्ही आम्ही एरेन्गेलवर जो जीवघेणा खेळ खेळतो त्यामागचा मास्टरमाइंड हा एरेन्गलच्या सर्वनाशातून वाचलेला मुलगा आहे.

....पण तो कोण आहे हे उघड करण्यात आलेलं नाही. कदाचित पुढच्या सिझनमध्ये त्याच्या पुढची कथा दाखवली जाईल. एक गोष्ट तर स्पष्ट आहे की या ट्रेलरमधून पब्जी ला ‘हंगर गेम्स, ‘दि ट्रुमन शो’ सारख्या सिनेमांचा टच द्यायचा पब्जीच्या मालकांचा प्रयत्न आहे.

एरेन्गल बेट कुठे आहे ?

राव, ज्यांना एरेन्गल माहित नाही अशा लोकांसाठी आम्ही थोडक्यात एरेन्गलविषयी सांगतो. एरेन्गल पब्जी खेळातलं काल्पनिक बेट आहे. याच बेटावर सगळा पब्जीचा खेळ रंगतो. हे बेट काल्पनिक असलं तरी त्याचं स्थान हे रशिया जवळच्या काळ्या समुद्रात सांगण्यात आलंय. या जागी कधीकाळी रशियन सैन्याचं तळ होतं. बेटावर सैन्याकडून रासायनिक/जैविक प्रयोग केले जायचे. स्थानिक लोकांनी एरेन्गल रशियन सैन्याकडून स्वतंत्र करण्यासाठी युद्ध पुकारलं. याचा शेवट म्हणजे हे बेट कायमचं निर्मनुष्य झालं. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेली कथा याच सर्वनाशाची असावी का ? हे तुम्हीच ठरवा राव.

तर मंडळी, ट्रेलर लोकांची प्रचंड उत्सुकता वाढवतोय. बोभाटा पब्लिकला ट्रेलर आवडला का ? आम्हाला नक्की सांगा !!

 

आणखी वाचा :

पब्जी भारतात बनला असता तर, या माणसाने केलेले चित्रण परफेक्ट आहे

पब्जीची कल्पना कोणाची ? पब्जी मधून नक्की किती कमाई होते ? 'पब्जी'विषयी या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहित नसतील !!

खऱ्याखुऱ्या आयुष्यात PUBG?? कोण आणि कुठे आयोजित करत आहे?

सबस्क्राईब करा

* indicates required