व्हिडीओ ऑफ दि डे : चक्क पर्यटकांना मिठ्या मारणारा सिंह बघितलाय का कधी ?

मंडळी, तुम्ही गाडीतून जंगल सफरीवर निघाला आहात आणि समोरून सिंह येताना दिसला तर काय होईल !! अर्थात कोणाची पण फाटेल राव. पण समजा तो सिंह जवळ आला आणि तुम्हाला खायचं सोडून चाटू लागला आणि मिठ्या मारू लागला तर ? काय होईल हे पाहण्यासाठी खालील व्हिडीओ बघा राव.

बसला ना धक्का. पण व्हिडीओ बनावट वाटतो हेही मान्य करायलाच पाहिजे. हा व्हिडीओ क्रीमियाच्या टायगन सफारी पार्कने व्हायरल केलाय. व्हिडीओ मध्ये दिसत असलेल्या सिंहाचं नाव फ्लीया आहे. पर्यटकांचा एक समूह सफरीवर निघालेला असताना त्यांच्या सोबत हा किस्सा घडला. आश्चर्याची गोष्ट  म्हणजे याच सफारी पार्क मधल्या एका सिंहाने नुकतंच एका मुलीवर हल्ला केला होता. एका बाजूला तो सिंह आहे आणि एका बाजूला हा सिंह. फ्लीया अशा प्रकारे पर्यटकांना मिठ्या मारत आहे जसं आपण जत्रेत हरवलेल्या भावाला मिठ्या मारू....असो....

आता आम्हाला सांगा तुमच्या सोबत असाच किस्सा घडला तर काय कराल ?? सांगा सांगा !!!

सबस्क्राईब करा

* indicates required