computer

या नवरा-नवरीने लग्न पत्रिकेवर 'क्यूआर कोड' का छापले आहेत?

डिजिटल क्रांतीमुळे देशाचे स्वरूप बदलत आहे. लग्ने देखील आता डिजिटल व्हायला लागली आहेत. लग्न पत्रिका छापून गावोगाव जाऊन वाटण्याऐवजी आता लोक व्हाट्सऍपद्वारे पत्रिका पाठवून देतात हे तर आता सगळ्यांनाच माहित झालेलं आहे. आता लोक त्याही पुढे जाऊ लागले आहेत.

मदुराईमधील एका लग्नात चक्क डिजिटल इंडियाचा नवा आविष्कार पाहायला मिळाला. या जोडप्याने आपल्या लग्नपत्रिकेवर ‘गुगल पे, ’फोन पे’चे क्यूआर कोड छापले होते. जेणेकरून पाहुण्यांना पैसे पाठवणे सोपे व्हावे.

लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना ना स्पेशल गिफ्ट आणण्याची गरज पडली, ना त्यांना रोख रक्कम देण्याची गरज पडली. ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केल्याने दोन्ही बाजूंची मोठी मेहनत वाचली असे म्हणावे लागेल.

या सुविधेचा लाभ घेत लग्नात जवळपास ३० लोकांनी या पद्धतीने पैसे ट्रासन्फर केले. सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

पैसे पाठवण्याचा हा सोपा उपाय तर आहेच पण कोरोना काळात पैसे स्वीकारल्यामुळे निर्माण होणारा धोकाही टाळला जातोय. तुम्हाला कशी वाटली ही पद्धत?

सबस्क्राईब करा

* indicates required