computer

दुधाची रिकामी पिशवी परत केल्यास ५० पैसे मिळणार ? काय आहे सरकारची नवी योजना ??

मंडळी, गेल्यावर्षी सर्व प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी आणण्यात आली होती. अपवाद होता पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिकचा. दुधाच्या पिशव्या पण पॅकेजिंगच्या अखत्यारीत येत असल्याने त्याही प्लास्टिक बंदीतून वाचल्या. या पिशव्यांवर रोख लावण्यासाठी एक वेगळी आयडिया शोधण्यात आली होती. सरकारने दुकानदारांना विनंती केली होती की तुम्ही रिकाम्या दुधाच्या पिशव्या ग्राहकांकडून घ्या आणि बदल्यात त्यांना पैसे द्या. ही विनंती अर्थातच कोणी ऐकली नाही.

...पण यावर्षी कायदाच करण्यात आला आहे. आता प्रत्येक दुकानदाराला रिकाम्या दुधाच्या पिशव्यांच्या बदल्यात ५० पैसे द्यावे लागतील. मंडळी, आता तुम्ही म्हणाल ‘५० पैशात काय होतंय ? आता तर आठाणे बंद झाले,’ पण महिनाभराचा हिशोब केला तर ‘हेही नसे थोडके’ असेच म्हणावे लागेल. याखेरीज दुसरा फायदा म्हणजे प्रदूषण कमी होईल. 

एका अहवालानुसार दररोज रस्त्यावर ३१ टन प्लास्टिक आणि १ कोटी पॉली पॅक फेकले जातात. हा आकडा काही प्रमाणात का होईना कमी होऊ शकतो. 
 
मंडळी, हे वाचल्या वाचल्या लगेच दुधाच्या पिशव्या घेऊन पळू नका. हा कायदा लागू होण्यासाठी आणखी एक महीन आहे.

तर मंडळ, दुधाच्या पिशवीच्या बदल्यात ५० पैसे देण्याची नवीन आयडिया तुम्हाला पटली का ? तुमचं मत नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required