computer

सोलापूरच्या तरुणाची निवड थेट इस्रोत झाली आहे....कौतुक तर व्हायलाच पाहिजे!!

दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणाला इंस्टाग्रामवर बग शोधला म्हणून २२ लाखांचे बक्षीस मिळाले होते. आता सोलापूरच्या एका तरुणाची थेट इस्रोत शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. ही कामगिरी करणारा तो महाराष्ट्रातील पहिला तरुण आहे.

पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावाचा सोमनाथ माळी याची केरळच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे सिनियर शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. यापूर्वी २०१६ साली सोमनाथने या पदासाठी अर्ज केला होता. पण तेव्हा त्याची निवड होऊ शकली नाही. यावेळी त्याने एम.टेकची डिग्री मिळवून पुन्हा अर्ज केल्यानंतर त्याची निवड झाली आहे.

सोमनाथची परिस्थिती ही कुठल्याही सामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलासारखी आहे. त्याच्या वडिलांनी आणि भावाने शेतीत काम करू प्रसंगी मजुरी करून त्याला शिकवले. आधी प्राथमिक आणि नंतर दहावीपर्यंत त्याने स्वतःच्या गावातच शिक्षण घेतले. 

अभ्यासू असलेल्या सोमनाथची निवड आयआयटी दिल्ली येथे झाली आणि त्याचे दिवस बदलले. त्याने प्रचंड मेहनत करून गेटची परीक्षा पास केली. आयआयटीत असताना त्याची निवड ही एयरक्राफ्ट इंजिन डिजाईनवर काम करण्यासाठी झाली होती. 

सोमनाथने मेहनतीच्या जीवावर संधी शोधल्या आणि आलेल्या संधीचा योग्य वापर करून घेतला आणि या कमी वयात इतकी मोठी गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required