computer

गोदावरीच्या स्वच्छतेसाठी पूर्ण दिवस एकाच जागी उभा राहणारा नदीप्रेमी !!

समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी थांबाव्या असे अनेकांना वाटत असते, पण त्यासाठी पुढाकार घ्यावा असे खूप कमी लोकांना वाटते. पण काही लोक असतात जे अपमान सहन करून, नुकसान सहन करून देखील काम करत राहतात.

नद्यांचे प्रदूषण हा मोठा मुद्दा आहे. नद्या प्रदूषित होऊ नये असे वाटणारे पण सामान्य लोक असतात आणि नदीत कचरा टाकणारे पण सामान्य लोक असतात. लोकांनी तसे करू नये यासाठी एक माणूस मात्र थेट गांधीगिरी स्टाईलने काम करत आहे.

नाशिक येथील चंद्रकिशोर पाटील यांना गोदावरीचे होत असलेले प्रदूषण योग्य वाटत नाही. म्हणून ते दर दसऱ्याला गोदावरी किनारी उभे राहतात, आणि कोणी कचरा टाकायला येईल, त्याला रोखतात. त्यांची पद्धत पण भारी आहे.

चंद्र किशोर पाटील शिट्टी घेऊन नदी किनारी उभे राहतात. कोणी कचरा टाकायला आला की ते शिट्टी वाजवतात. समोरच्याला आपोआप कळते आणि तो कडेकडेने तिथून सटकतो. असे काम केल्यास विरोध होणे देखील साहजिक आहे.

यासाठी देखील त्यांनी भन्नाट आयडिया शोधून काढली. जो कोणी त्यांना विरोध करतो त्याला ते नदीतील प्रदूषित पाणी बाटलीत भरून त्याला पिण्यास देतात, लोक अर्थातच ते पाणी पिण्यास नकार देतात, मग पाटील त्यांना आपणच टाकलेल्या कचऱ्यामुळे ही परिस्थिती झाली आहे अशी समज देतात. 

त्यांचे फोटो आयएफएस अधिकारी श्वेता बोद्दु यांनी शेयर केला आहे. त्यांनी ट्विट करत सांगीतले की 'चंद्र किशोर हे लोकांकडून कचऱ्याच्या थैल्या घेऊन बाजूला ठेवतात, नंतर पालिकेचे कर्मचारी येऊन तो कचरा गोळा करून घेऊन जातात.' 

सबस्क्राईब करा

* indicates required