computer

प्राणीसंग्रहालयातील सिंहासोबत सेल्फी घेणारा पठ्ठ्या !!

सिंहाच्या तावडीतून सुटून आलेल्या लोकांबद्दल तुम्ही ऐकले असेल. प्राणी संग्रहालयात सुद्धा काही वेळा अपघात होऊन लोक हिंसक प्राण्यांच्या तावडीत सापडतात आणि जे अशा परिस्थितीत पण सुखरूप बाहेर येतात त्यांचे कौतुकही खूप होते. पण एक पठठ्या थेट सिंहासोबत सेल्फी काढून आला आहे राव!!

दिल्लीतील एका प्राणीसंग्रहालयात हा विचित्र प्रकार घडला. एक माणूस आला आणि अचानक वाघाच्या पिंजऱ्यात त्याने उडी मारली. एवढेच नाही तर गडी सिंहाजवळ जाऊन बसला. 

भाऊ जवळपास 30 सेकंद सिंहाजवळ बसून होता. या 30 सेकंदात त्यांनी काय एकमेकांशी गप्पा मारल्या, त्यांनाच ठाऊक, पण बाहेर उभ्या असलेल्या लोकांचे मात्र धाबे दणाणले राव!! ते त्याला बाहेर येण्यासाठी विणवू लागले, बाहेरून असे वाटत होते की सिंह कधीही त्याच्यावर हल्ला करेल.

त्यानंतर तो विडिओ सोशल मीडियावर जबरदस्त वायरल झाला. व्हिडीओत जरी सेल्फी घेताना दिसत नसले तरी व्हिडिओत एक आवाज येत आहे आणि त्यात एक व्यक्ती म्हणत आहे की हा सिंहासोबत सेल्फी घेतोय. यावरून हा गडी सिंहासोबत सेल्फी घेऊन आला म्हणत सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. 

ही गोष्ट प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांना समजल्यावर त्यांनी त्याला तिथून बाहेर काढले व पोलिसांकडे सोपवले. नंतर पोलिसांना कळले की तो मानसिक रोगी आहे.

मंडळी 2004 साली एक युवक असाच सिंहाच्या पिंजऱ्यात घुसला होता. तेव्हा सिंहाने त्याच्यावर हल्ला होता, त्यात त्याचा मृत्यू झाला होता.

सबस्क्राईब करा

* indicates required