या व्यक्तीने म्हटले “नरेंद्र मोदी माझ्यासाठी काम करतात”...पाहा यावर काय म्हणाले मोदी?

उत्तर प्रदेश निवडणुकीतला विजय आणि होळी असा एकत्र योग जुळून आल्यावर अनेकांनी युपी विजयाच्या आणि होळीच्या शुभेच्छा एकत्रच नरेंद्र मोदींना दिल्या. आता या शुभेच्छा इतक्या जास्त होत्या की सर्वांना उत्तर देणं मुश्कील होतं.. पण मोदींनी जमेल तेवढ्यांना स्वतः रिप्लाय देत सुखद धक्का दिला. यातलं एक ट्विट त्याअर्थी खास ठरलं, कारण या इसमाला काही वेगळंच म्हणायचं होतं.

अजित सिंह या व्यक्तीनं नरेंद्र मोदींना उद्देशून एक ट्विट केलं. अश्या साध्या ट्विटला मोदी कशाला बघतील? पण मोदींनी लगेचच यावर आपली प्रतिक्रिया दिली. हे ट्विट असे होते कि “मला एकाने विचारले कि तू नरेंद्र मोदीसाठी काम करतो का ? यावर मी हसून म्हणालो कि मी त्यांच्यासाठी नाही उलट ते माझ्यासाठी काम करतात”!!

यावर नरेंद्र मोदींनी उत्तर देताना सर्वांना चकित तर केलेच, पण भारताच्या पंतप्रधानांकडून जे अपेक्षित होते तेच घडले. त्यांचे उत्तर होते कि “मला भारताच्या प्रत्येक नागरिकाचा प्रधान सेवक असण्याचा निश्चितच आनंद आहे”.

नरेंद्र मोदींनी स्वतःला प्रधान मंत्री नव्हे तर प्रधानसेवक म्हणवून घेतल्याने निश्चितच त्यांनी पुन्हा एकदा सर्वांची माने जिंकली आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required