computer

आता या ५ बँकांमधून डेबिट कार्डशिवाय पैसे काढता येणार....संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घ्या !!

पूर्वी बॅंकेत पैसे काढायचे असतील तर लांब रांगेत उभे राहणे हे पक्के असायचे. अडचणीच्या काळात तर हा उशीर आणखीनच तापदायक असायचा. मग ATM कार्ड आले, पैसे काढणे सोपे झाले. जसजसे डिजिटल व्यवहार वाढत आहेत बँकानी ग्राहकांसाठी अनेक नवीन सुविधा आणल्या. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे देशातील चार अग्रगण्य बँकांनी आता ATM मशीन मधून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा वापर करून देशात कुठूनही आणि कधीही आपल्या खात्यातून पैसे काढणे आता शक्य आहे. स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा,आरबीएल बँक या बँकेच्या ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध आहे.

आज समजून घेऊ या ही कार्डशिवाय पैसे काढायची सुविधा कशी वापरतात. सुरुवात करूया पासून

SBI बँकची कार्डलेस सुविधा:

- स्टेट बँकेत खातं असलेल्यांनी योनो ऍप डाउनलोड करावे. लॉगिन केल्यानंतर Yono Cash या पर्यायावर क्लिक करावे.

-तिथे ATM सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एटीएममधून किती रक्कम काढायची आहे ते लिहावे.

- त्यानंतर स्टेट बँके तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर योनो कॅश ट्रान्झॅक्शन नंबर पाठवेल.

- तो नंबर आणि तुमचा पिन स्टेट बँकेच्या कार्डलेस ट्रान्झॅक्शन सुविधा वापरण्यासाठी आवश्यक आहेत.

-  स्टेट बँकेच्या कार्डलेस ट्रान्झॅक्शन सुविधा उपलब्ध असलेल्या एटीएम केंद्रात गेल्यावर तिथल्या पहिल्या पेजवर card-less transaction हा पर्याय स्वीकारावा आणि त्यानंतर Yono Cash हा पर्याय निवडावा. व वरील दोन्ही क्रमांक लिहावेत. 

यानंतर तुम्ही ठरवलेली रक्कम तुम्हाला लगेचच मिळेल.

ICICI बँक कार्डलेस सुविधा: 

- 'iMobile' या ऍपमध्ये लॉगिन करावे. त्यात 'Services' आणि 'Cash Withdrawal at ICICI Bank ATM' हे पर्याय निवडावेत.

- त्यानंतर तुम्हाला किती रक्कम काढायची आहे ते लिहावे. तुमचा खाते क्रमांक निवडावा.

- त्यानंतर चार अंकी तात्पुरता पिन नंबर तयार करावा आणि सबमिट करावा.

- तुम्हाला लगेच OTP (One Time Password) येईल.

- त्यानंतर ICICI बँकेच्या कोणत्याही एटीएम केंद्रात जाऊन  Cardless Cash Withdrawal हा पर्याय निवडावा.

- Enter mobile number हा पर्याय निवडून नंतर 'reference OTP number' वर क्लीक करावे.

- तुमचा टेम्पररी पिन टाकून किती रक्कम काढायची आहे ते लिहावे.

बँक ऑफ बडोदा कार्डलेस सुविधा:

- BOB M-connect हे अँप डाउनलोड करून कार्डलेस व्यवहारासाठी ओटीपी तयार करावे.

- BOB Mobile Banking मध्ये लॉगिन करा आणि Premium Services टॅबवर क्लिक करा.

- त्यानंतर Cash on Mobile service या पर्यायावर क्लिक करा.

- तुमचा खाते क्रमांक सिलेक्ट करा, किती रक्कम काढायची तो आकडा सबमिट करा.

- त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल.

- तुमच्या जवळच्या बँक ऑफ बडोदा एटीएममध्ये जा. तिथे एटीएम स्क्रीनवर Cash on Mobile हा पर्याय निवडा.

- त्यानंतर ओटीपी टाकून तुम्हाला हवी असलेली रक्कम काढा.

कोटक महिंद्रा बँक कार्डलेस सुविधा:

- कोटक नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग अँपमध्ये लॉगिन करा.

- बेनिफिशियरी नेम, मोबाइल नंबर आणि पत्ता या गोष्टी भरून नोंदणी करा. ही नोंदणी एकदाच करता येते.

- ATM स्क्रीनवर cardless cash withdrawal किंवा instant money transfer यापैकी एक पर्याय निवडावा.

- बेनिफिशियरीने मोबाइल नंबर टाकल्यावर एसएमएस  द्वारे कोड येतील तो कोड टाकून पैसे काढता येतात.

आरबीएल बँक कार्डलेस सुविधा:

- आरबीएल बँकेच्या MoBank अँपमध्ये लॉगिन करावे.

- कार्डलेस कॅश विड्रॉल सुविधा असलेले बँकेचे एटीएम शोधा.

- खात्याला जोडलेला मोबाइल नंबर वापरून पैसे काढायची प्रक्रिया सुरू करा.

- मोबाइल अँपमध्ये IMT बटनावर क्लीक करून कोड मिळवा.

- त्या कोडचा वापर करून हवी असलेली रक्कम काढा.

 

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required