computer

डॉक्टरच्या रूपातला देवदूत...रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी त्याने दाखवलेल्या हिमतीला तोड नाही !!

डॉक्टरी व्यवसाय हा फक्त पैसे लुटण्यापुरता राहिला आहे. अशी बदनामी या क्षेत्राची झालेली आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या गब्बर सिनेमात हॉस्पिटलमध्ये कसे लोकांना लुटले जाते याचे डोळस वर्णन केले होते. पण आजही काही डॉक्टर प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असतात. अशाच एका डॉक्टरांबद्दल आम्ही काही दिवसांपूर्वी तुम्हाला सांगितले होते.

ओडिशात आता अश्याच एका डॉक्टरच्या रूपात देवदूताचे दर्शन झाले आहे. हॉस्पिटलमध्ये ऍम्ब्युलन्स नव्हती म्हणून त्यांनी तब्बल 5 किलोमीटर एका रुग्णाला आपल्या खांद्यावरुन घेऊन गेले. 

ओडिशातील मलकानगिरी येथे एका 12 वर्षाच्या मुलाला तीव्र ताप होता. त्याच्या घरच्यांनी एम्बुलेंस बोलविली पण एम्बुलेंस उपलब्ध होऊ शकली नाही. त्यावेळी आरोग्य प्लस नावाच्या एका ngo त काम करणाऱ्या शिवप्रसाद मिश्रा नावाच्या एका डॉक्टरने तिथून पाच किलोमीटरवर असलेल्या दवाखान्यात त्या रुग्णाला आपल्या खांद्यावर नेले. तिथे त्या मुलावर उपचार करण्यात आला.

ओरीसातील मलकानगिरी हा जिल्हा नक्षलग्रस्त समजला जातो. अशा दुर्गम भागात सगळ्याच सोयीसुविधांचा दुष्काळ असतो. अशा वेळी शिवप्रसाद मिश्रा यांच्यासारखे प्रामाणिक कर्मचारी देवदूतासारखे उभे राहत असल्याने अनेकदा स्थानिक लोकांवरील मोठे संकट टळते.

 

लेखक : वैभव पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required