computer

पेटीएम ॲपवर गुगलने बंदी आणली आहे, पण घाबरून जाऊ नका, या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या !!

आज गुगलने पेटीएम ॲप गुगल प्लेस्टोरवरून काढून टाकलेलं आहे. थांबा. लगेच घाबरू नका. तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं पेटीएम ॲप बंद होणार नाही, पण कोणालाही नव्याने पेटीएम ॲप  डाऊनलोड करता येणार नाही. याखेरीज नवीन अपडेट्सही येणार नाहीत.

पेटीएमवर बंदी का आली?

गुगलचं म्हणणं आहे की गुगल प्लेस्टोरच्या पॉलिसीनुसार जुगाराशी संबंधित कोणत्याही ॲपला गुगल प्लेस्टोरवर बंदी आहे. पेटीएमने नेमका हाच नियम मोडलाय. पेटीएमने जुगार खेळता येण्याजोग्या फँटसी गेमिंगला प्रोत्साहन दिलं. गुगलचं म्हणणं आहे की कोणतंही ॲप जर पैसे देऊन खेळल्या जाणाऱ्या सामन्यांची संबंधित गेमिंगला प्रमोट करत असेल तर ते प्लेस्टोरचा नियम मोडणारं आहे. पेटीएमचं पेटीएम फर्स्ट गेम्स’ हे ॲपही गुगल प्लेस्टोरवरून काढून टाकण्यात आलं आहे.

यंदाच्या आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वीच हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. आयपीएलसारखे सामने बेटिंगसाठी सुगीचा हंगाम असतो. पेटीएमवर आणलेली बंदी एकप्रकारे ऑनलाईन बेटिंगला प्रोत्साहन देणाऱ्या इतर ॲप्ससाठी इशारा आहे.

जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. पेटीएमवर बंदी आलेली असली तरी पेटीएम मनी आणि पेटीएम मॉल ॲप्सवर बंदी आलेली नाही. पेटीएम मनीच्या माध्यमातून जर तुम्ही म्युचुअल फंड्स किंवा शेअरमध्ये पैसे गुंतवले असतील तर घाबरून जाऊ नका. पेटीएम वॉलेट वापरणाऱ्या जनतेसाठी अशी सूचना आहे की तुम्हाला पैसे बिनदिक्कत ट्रान्स्फर करता येणार आहेत. त्यावर बंदी आलेली नाही. 

एकूणच, पेटीएम बंद पडलं तरी घाबरण्याचं कारण नाही. ही बंदी केव्हापर्यंत टिकेल हे मात्र सांगता येणार नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required